Home कृषीजागर सवना ज., रमणवाडी ते चिंचोरडी पांदण रस्त्याचे मजबुतीकरण पावसाळ्यापूर्वी पुर्ण करा…

सवना ज., रमणवाडी ते चिंचोरडी पांदण रस्त्याचे मजबुतीकरण पावसाळ्यापूर्वी पुर्ण करा…

सवना ज., रमणवाडी ते चिंचोरडी पांदण रस्त्याचे मजबुतीकरण पावसाळ्यापूर्वी पुर्ण करा…

👉 शेतकऱ्यांनी मागणी.

मारोती अक्कलवाड पाटील
जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक- 11 एप्रिल 2022

गेल्या एक वर्षापासून मातीकाम करुन अजुन सवना, रमणवाडी ते चिंचोरडी पांदण रस्त्याचे काम जशास तसे आहे.
तालुक्यातील सर्वात मोठा पांदण रस्ता असुन, पंचेचाळीस फुट रुंद आहे. या मार्गावर प्राथमिक आरोग्य केंद्र असुन, शेजारच्या तेलंगणाला राज्याची सिमा पाच ते सहा किलो मीटर अंतरावर आहे.
सवना, रमणवाडी, चिचोरडी येथील सर्व शेतकरी बांधवांनी मिळुन लोकसहभागातून हा पांदण रस्ता केला आहे. परंतु हा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती मा. जिल्हा परिषद सदस्य सुभाष दादा राठोड यांनी सवना येथील भेटी दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांना दिली होती. परंतु आजतागायत या पांदण रस्त्याचे मजबुतीकरणाचे काम सुरू झाले नाही. हा पांदण रस्ता यावर्षीच्या पावसाळ्यापूर्वी करून, शेतकरयांना चारचाकी वाहने नेणयास मोठे सोईचे होईल. पंधरा किलोमीटर अंतरावरून शेतकऱ्यांना आपल्या शेतातील झालेला माल टॅक्टरने न्यावा लागतो आहे.
या बाबींकडे लोकप्रतिनिधी नी विशेष लक्ष देऊन, पांदण रस्त्याचे मजबुतीकरण पावसाळ्यापूर्वी करावे अशी मागणी सवना, रमणवाडी, चिंचोली, एकघरी, वाशी आदि गावातील शेतक-यांनी केली आहे.

Previous articleज्योतिबा ची शाळा
Next articleकदमापूर येथे मासिक पाळी विषयी कार्यशाळा संपन्न