Home Breaking News सिंधुदुर्ग मध्ये मोठी दुर्घटना, अकोल्यातील युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू 

सिंधुदुर्ग मध्ये मोठी दुर्घटना, अकोल्यातील युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू 

अकोला- सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज सकाळच्या सुमारास पर्यटकांनी भरलेली बोट पलटी झाल्यामुळे त्यामध्ये अकोल्यातील  युवकाचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे,  यामध्ये अकोल्यातील आकाश देशमुख नामक युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सदर युवक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांचा भाचा असल्याचे कळते. आकाश देशमुख कुटुंबात एकुलता एक मुलगा असल्याचे कळते. प्राप्त माहिती अनुसार अकोल्यातील काही युवक गोवा सहलीसाठी गेले होते, आज सकाळी ते सिंधुदुर्ग समुद्रामध्ये बोटिंग करण्यासाठी पाण्यामध्ये उतरले होते त्यामध्ये आकाश देशमुख हा युवक सुद्धा पाण्यामध्ये उतरला होता, आकाशला पोहणे येत नसल्यामुळे हा पाण्यामध्ये बुडाला त्यामध्ये आणखी एका युवकाचा मृत्यू झाल्याचे कळते बाकी युवक सुखरूप असल्याची माहिती प्राप्त झाली आहे

Previous articleनविन पिक कर्जाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
Next articleभाव दर कमी;उत्पादन खर्च अधिक असल्याने कांदा उत्पादक अडचणीत.