Home कृषीजागर भाव दर कमी;उत्पादन खर्च अधिक असल्याने कांदा उत्पादक अडचणीत.

भाव दर कमी;उत्पादन खर्च अधिक असल्याने कांदा उत्पादक अडचणीत.

योगेश घायवट
वाडेगाव:- बाळापूर तालुक्यातील वाडेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते.परंतु या वर्षी शासनाकडून कांदा भाव कमी असल्याने शेतकरी अडचणी मध्ये सापडला आहे.
रब्बी हंगामातील कांदा पीक परीसरात सध्याच्या परिस्थितीत अंतिम टप्प्यात असून जास्त तापमान मुळे उत्पादनात घट निर्माण होत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच उत्पादन खर्च अधिक असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. गत पावसाळ्यात अधिक प्रमाणात पाऊस पडला असल्याने रब्बी हंगामात गहू हरभरा या पीकांच्या तुलनेत कांदा पिकाची लागवड परीसरात अधिक प्रमाणात करण्यात आली होती. अडीच ते साडेतीन महिन्याचा कालावधी असलेल्या कांदा पिकाचा आंतर मशागतीसह इतर उत्पादन खर्च अधिक प्रमाणात करावा लागतो. तर कांदा पीक लागवडीचे कालावधीत म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात बदललेल्या वातावरणामुळे पाउस व धुकं मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे बहुतांश क्षेत्रातील लागवड करण्यात आलेल्या कांदा रोप जळुन पीकाला झळ बसली होती. परीणामी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट निर्माण होत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच सध्याच्या परिस्थितीत बाजारात कोसळलेले कांद्याचे भाव यामुळे एकीकडे मुळात उत्पादनात घट तर दुसरीकडे बाजारात कोसळलेले कांद्याचे भाव यामुळे खरीप हंगाम तोंडावर असताना कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे कांदा पीक लागवड ते अंतिम टप्प्याच्या कालावधी पर्यन्त वन्य प्राण्यांचा सुळसुळाट तसेच विद्युत भारणीयमन यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पीक संरक्षणासाठी तसेच ओलित व्यवस्थापन करण्यासाठी
तारेवरची कसरत करावी लागली आहे.सध्याच्या परिस्थितीत परिसरात कांदा पीक अंतिम टप्प्यात असून समाधानकारक भाव नसल्याने कांदा साठवणूक कामाची लगबग दिसून येत आहे .तर या कामी लागणारा मजूर वेळेत मीळत नसल्याने शेतकरी बांधवांना मजुर शोधण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हाती आलेल्या उत्पादनाला भविष्यात समाधान कारक बाजारपेठ मिळेल अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकरी ठेवून आहेत.
कांदा पिकाला भरपूर पाणी द्यावे लागते खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणात करावा लागतो. यावर्षी उत्पादन खर्च अधिक तर उत्पन्न कमी तर मिळालेल्या उत्पन्नाला कवडीमोल मिळत असलेला भाव अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

कांदा या पिकाला भाव नसल्याने आम्ही शेतकरी हतबल झालो आहे.तरी शासनाने दखल घेऊन शेतकऱ्यांचा कांदा पिकाला योग्य भाव देण्यात यावा जनेकरून शेतकरी यांना आर्थिक झळ पोहचणार नाही..

पांडुरंग चोपडे
शेतकरी वाडेगाव

बदलत्या वातावरण मूळे कांदा या पिकात घट निर्माण झाली आहे.आज रोजी लावलेला खर्च निघणे सुद्धा कठीण झाला आहे.योग्य भाव मिळल्यास खर्च निघेल या आशेवर आम्ही शेतकरी आहो..

निवृत्ती म्हैसने युवा शेतकरी वाडेगाव

Previous articleसिंधुदुर्ग मध्ये मोठी दुर्घटना, अकोल्यातील युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू 
Next articleकरंजी येथे शेतकरी प्रशिक्षण संपन्न.