Home Breaking News वडगाव ( ज ) येथे सबस्टेशन असुनही चार दिवसापासून गाव अंधारात ..

वडगाव ( ज ) येथे सबस्टेशन असुनही चार दिवसापासून गाव अंधारात ..

हिमायतनगर -कृष्णा राठोड
तालुक्यातील वडगाव ज येथे सबस्टेशन होऊन देखील हे गाव दोन दिवसापासून अंधारात असल्याने नागरीकांना पावसाळ्यात रात्रभर अंधाराचा त्रास सहन करावा लागत असून गावात सबस्टेशन असुन हि परिस्थिती असल्यामुळे इतर गावांची काय हाल असेल असा प्रश्न नागरिकांना उपस्थित होत असुन सबस्टेशन असुनही गाव दोन दिवसापासून अंधारात असल्यामुळे महावितरणचया दिव्याखाली अंधार म्हणण्याची वेळ येथील नागरीकांवर आली आहे.

वडगाव ज येथे गेल्या चार वर्षांपूर्वी महावितरण चे सबस्टेशन बसविण्यात आले. या सबस्टेशन वरून सोळा गावांना विद्युत पुरवठा होतो. या सबस्टेशन वरून विद्युत पुरवठा होणाऱ्या गावांना दररोज अंधारात रात्र काढावी लागत आहे. महावितरण कंपनीच्या उपअभियंता यांना सरपंच विशाल भाऊ राठोड यांनी संपर्क करून येथील लाईट बाबत तक्रारी केल्या तरी देखील उपअभियंता यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे हिमायतनगर तालुक्यात महावितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचारी यांच्या निष्काळजीपणा मुळे अनेक गावे अंधारात राहत आहेत.

Previous articleअखेर.. पाऊस बरसला!
Next articleहिमायतनगर रेल्वे विभागाचा भोंगळ कारभार उघड!