Home कृषीजागर मराठवाड्यातील शेतकऱ्यांची तेलंगणातील कपाशी बियाण्याला पसंती

मराठवाड्यातील शेतकऱ्यांची तेलंगणातील कपाशी बियाण्याला पसंती

मारोती अक्कलवाड पा.सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 04 जुन 2022

हवामान खात्याने यावर्षी मान्सुन सहा ते दहा जुन रोजी महाराष्ट्रात धडकणार आहे. असा अंदाज वर्तविला आहे. संबंध जिल्ह्यात बळीराजाची ईच्छा एकच असते. ती म्हणजे उच्च आणि चांगल्या दर्जाचे आणि अधिक उत्पादन देणाऱ्या वाणाची निवड करणे.
म्हणुन संबंध मराठवाडा, विदर्भातुन महाराष्ट्र राज्याच्या सिमावरती भागातील सर्व शेतक-यांनी, तेलंगणातील जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या, आदिलाबाद येथील कृषि सेवा केंद्र आणि बाजारात बियाणे खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली आहे.
मराठवाड्यातील कृषि विभाग आणि कृषि सेवा केंद्रावरील स्थानिक शेतकऱ्यांचा विश्वास कमी होत आहे का? असेच या ठिकाणी नमुद करावे लागेल.
काही शेतकऱ्यांनी तेलंगणा राज्यातील बियाणे हे उत्तम आणि चांगल्या प्रतिचे, उगवण क्षमता चांगली होते. आणि उत्पादणात चांगली वाढ होत आहे. असे स्पष्ट सांगितले.
म्हणुनच मराठवाडा, विदर्भातील काही शेतकरी बियाणे खरेदी करण्यासाठी तेलंगणातील बाजारात जात असल्याचे चित्र दिसत आहे.

Previous articleकांतराव झरीकर यांचा संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्याकडून सत्कार
Next articleकृषीभूषण मेघा देशमुख यांची मातोश्री इंदिराबाई देशमुख वैकुंठ धामास  ( एक लक्ष) रुपयांची देणगी