Home Breaking News हिमायतनगर तालुक्यात संततधार पावसामुळे अनेक गावाचा तुटला संपर्क….

हिमायतनगर तालुक्यात संततधार पावसामुळे अनेक गावाचा तुटला संपर्क….

👉🏻 शेतकऱ्याच्या शेतातील पिकाचे नुकसान        👉🏻महसूल चे अधिकारी मात्र गायब ….

हिमायतनगर /-.कृष्णा राठोड
तालुक्यात काल दि ७ जुलै पासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक गावांमध्ये पाऊसाचे पाणी शिरल्याने अनेकांच्या घरांमध्ये पाणी जाऊन जन जीवन विस्कळीत झाले, असल्याचे चित्रपहायला मिळत आहे तर शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असल्याचे पहायला मिळत आहे. तर तालुक्यातील पळसपुर ते डोल्हारी बोरगडी तांडा सह ,पवना- आंदेगाव , पांगरी खैरगाव, सावना , महादापूर , अनेका गावांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. अनेक गावांमध्ये हीच परस्थिती पाहण्यास मिळत आहे तर अनेक गावचा संपर्क तुटल्याने जन जिवन विस्कळीत झाले आहे

त्यामुळे असंख्य नागरिक आपला जीव मुठीत धरून या मुसळधार पाऊसा पासून आपले संरक्षण करण्यासाठी ठिकाणी सहारा घेत आहेत तर तालुक्यातील पूरग्रस्त परिस्थिती पाहणी करण्यासाठी हिमायतनगरचे तहसिलदार यांनी महसूल प्रशासन कर्मचाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्याची व कार्यालयीन ठिकाणी राहण्याचा आदेश पारित करतील काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .जन्य सामान्यातून हे नेहमी नोट रीचेबल राहत आहेत असेही बोलले जात आहे त्यामुळे हिमायतनगर येथील महसूल प्रशासनाने अंतर्गत येणारे सर्वच कर्मचारी नुसार ये जा करत असल्याचे चित्र सध्या तरी तालुक्यात दिसत आहे. तलाठी महोदय तर तलाटी सज्जावर न राहता हिमायतनगर या ठिकाणी आपले कार्यालय काटोल गावांचा कारभार खात असल्याचे दिसत आहे ,याकडे राजकीय पुढार्‍यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे जनसामान्यात बोलले जात आहे ,तर काही कर्मचारी हे नांदेड सारख्या ठिकाणी सुरक्षित राहून काही महसूलचा कारभार सांभाळत उंटावरून शेळ्या हाकलत असल्याचा प्रकार सध्यास्थितीत पाहावयास मिळत आहे.
जर अशाच प्रकारचा जर पाऊस आणखी काही दिवस पाऊस पडत राहिल्यास जनजीवन मोट्या प्रमाणात विस्कलीत होईल.
याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, असे मागणी समस्त नागरिकांनी केली आहे.

भूमिराजा न्यूज, शहर प्रतिनिधी, कृष्णा राठोड
९१४५०४३३८१

Previous articleपरभणी-हिंगोली-नांदेड जिल्ह्यात मुसळधार प्रजन्यवृष्टी, पिके खरडली!
Next articleहिमायतनगर ते बोरगडी मुख्य रस्त्याचे चालू  असलेले काम थातूरमातूर .,..