Home कृषीजागर कृषी पंपाचा शॉक लागून तरुण शेतकरी पुत्राचा मृत्यू

कृषी पंपाचा शॉक लागून तरुण शेतकरी पुत्राचा मृत्यू

गावात पसरले दुःखाचे डोंगर

नासिर शहा
पातूर तालुका प्रतिनिधी
पिंपळखुटा : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळखुटा येथे शॉक लागून तरुण शेतकरी पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि. २० जुलै रोजीच्या सायंकाळी घडली, त्यामुळे गावासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेख बरकत शेख सुलेमान, असे मृतक तरुनाचे नाव आहे, शेख बरकत बुधवार रोजी शेतात पिकावर फवारणी करण्यासाठी गेला होता, दिवसभर फवारणी केली, फवारणीचे काम अंतिम टप्प्यात सुरू असताना कृषीपंपाच्या केबलचा जबर शॉप लागल्याने ते गंभीर झाला, सदर घटनेची माहिती मिळतात शेजारी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी तत्काळ धाव घेऊन त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले तेथे प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला अकोला येथे हलविण्यात आले, परंतु त्याच दरम्यान रस्त्यात मृत्यू झाला, बरकतच्या मृत्यूमुळे गावात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात लहान एक वर्षाची मुलगी आहे.

Previous articleदेशाच्या राष्ट्रपतीपदी द्रोपती मुर्मु व ओबीसीचे आरक्षण मिळाल्या बद्दल हिमायतनगर येथे दुहेरी आनंदोत्सव साजरा करण्यात आला…..
Next articleआमदार नितीन देशमुख यांनी केली नुकसान ग्रस्त भागाची पाहणी.