Home Breaking News प्रा. डॉ. आनंद रत्नाकर आहिरे यांची ऐतिहासिक विक्रमाची नोंद रेडियंट टॅलेंट बुक...

प्रा. डॉ. आनंद रत्नाकर आहिरे यांची ऐतिहासिक विक्रमाची नोंद रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड किताब सन्मानपूर्वक बहाल

अँकर शितल शेगोकार प्रतिनिधी शेगाव

रविवार दि.4 डिसेंबर 2022 प्रा. डॉ. आनंद रत्नाकर आहिरे संस्थापक, संचालक, आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या शाखा आहेत. त्यांना डॉ. क्रांतीकुमार महाजन ( आंतरराष्ट्रीय कीर्तीमान लेखक, 22 आवृत्ती सुभाष सिक्रेट पुस्तक लेखक आणि चीफ एडिटर, रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड अँड सेवन वंडर्स पब्लिकेशन्स, पीस अँबेसिडर, गांधी पीस फाउंडेशन नेपाळ, वर्ड रेकॉर्ड युनियन बुक विनर, इंटरनॅशनल मेंबर ऑफ WCPA (USA ) अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रा. डॉ. आनंद रत्नाकर आहिरे यांना ( रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड ) किताब सन्मानपूर्वक आहिरे स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी, संचेती टॉवर, अशोक स्तंभ, नाशिक येथे प्रदान केला.
भारतभूषण प्रा. डॉ. आनंद रत्नाकर आहिरे यांनी सन 2011 साली ‘ आहिरे स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी कल्याण येथे सुरू केली होती. नंतर हळूहळू महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरू झाली. या अकॅडमीमध्ये भारतामधून आजतागायत 16 हजार विद्यार्थी शिकून गेले त्यात 1394 विद्यार्थी नेट/सेट वरिष्ठ महाविद्यालयासाठी प्राध्यापक परीक्षेत विविध विषयाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले.221 विद्यार्थी फक्त मराठी विषयात नेट /सेट उत्तीर्ण झाले आणि 250 च्या महाराष्ट्र पोलीस परीक्षेत उत्तीर्ण झाले. तर 150 च्या वर प्रशासकीय अधिकारी म्हणून उत्तीर्ण झालेले आहेत. या प्रा. डॉ. आनंद आहिरे यांच्या मार्गदर्शनाचे दैदीप्यमान यशाची दखल डॉ. क्रांतीकुमार महाजन व त्यांच्या समितीने घेऊन प्रा. डॉ. आनंद रत्नाकर आहिरे यांची रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सन्मानपूर्वक नोंद केली.
या अगोदर प्रा. डॉ. आनंद रत्नाकर आहिरे यांची वर्ल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड सन 2018 मध्ये थायलंड या देशात नोंद झालेली होती तर एशियन टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड सन 2019 मध्ये दिल्ली येथे नोंद झालेली होती. आणि आता रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड सन 2022 मध्ये नाशिक येथे सन्मानपूर्वक किताब बहाल झाला. प्रा. डॉ. आनंद आहिरे यांचे शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक कार्य बघता त्यांना आतापर्यंत विविध संस्थेने 96 आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, व राज्य पुरस्कार सन्मानपूर्वक बहाल झालेले आहेत.
प्रा. डॉ. आनंद आहिरे यांनी सन 2016 पासून पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सुरू केलेली आहेत. त्याच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक कार्य करीत आलेले आहे. त्या संस्थेच्या अंतर्गत सन 2022 जानेवारी मध्ये नाशिक येथे पुष्परत्न साहित्यसमूह सुरू केलेला आहे. त्याच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या आद्य रविवारी राज्यस्तरीय कवी संमेलन व पुष्परत्न काव्य गौरव सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जाते.संपूर्ण महाराष्ट्रातून कवी, कवयित्री आपल्या कविता सादर करण्यास नाशिक येथे येतात. आतापर्यंत 43 च्या वरती कवी संमेलन व साहित्य संमेलनाचे आयोजन महाराष्ट्र व भारताच्या विविध ठिकाणी पुष्परत्न बहुउद्देशीय सेवा व पुष्पररत्न साहित्य समूहाने केलेले आहे. असे जागतिक कवी व साहित्यिकांसाठी हक्काचे विचारपीठ पुष्परत्न साहित्यसमूह प्रा. डॉ. आनंद आहिरे यांनी सुरु केले आहे. रविवार दि.4 डिसेंबर2022 रोजी पुष्परत्न साहित्य समूहाचे सातवे पुष्प गुंफण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार महाजन( आंतरराष्ट्रीय कीर्तीमान लेखक, आंतरराष्ट्रीय अष्टपैलू व्यक्तिमत्व ) उपस्थित होते. त्यांच्या व अभिनेत्री रुपाली पवार ( ब्रँड अँबेसिडर, रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड )अशा विविध मान्यवरांच्या हस्ते प्रा. डॉ. आनंद रत्नाकर आहिरे यांना रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड किताब सन्मानपूर्वक बहाल केला गेला. संपूर्ण भारतामधून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

Previous articleडॉ. अशोक शिरसाट राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित : अकोला
Next articleश्री संत तुळसाबाई यात्रा महोत्सव पिंपळखुटा