Home Breaking News गणेशोत्सवात विद्युत पुरवठा नियमित खंडित होत असल्याने भारतीय जनता पार्टी हिमायतनगर तर्फे...

गणेशोत्सवात विद्युत पुरवठा नियमित खंडित होत असल्याने भारतीय जनता पार्टी हिमायतनगर तर्फे महावितरण च्या उपविभागीय अभियंताना देण्यात आले निवेदन!

भूमीराजा न्यूज, शहर प्रतिनिधी, कृष्णा राठोड -९१४५०४३३८१

हिमायतनगर/-
तालुक्यासह ग्रामीण भागामध्ये’ श्री ‘ चे मोठया थाटात, आगमन झाले आहे. पण या धार्मिक सणांच्यां काळात विद्युत पुरवठा सुरळीत चालू नसल्याने शहरी, ग्रामीण परिसरातील गणेश भक्तांकडून महावितरण वर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यासाठी हिमायतनगर भाजपा तर्फे विद्युत पुरवठा सुरळीत देण्यासाठी दि.०३/०९/२०२२ ला निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
सद्या महाराष्ट्र राज्यात धार्मिक हिंदू सणांपैकी गणेश उत्सव,मंगळा गौरीदेवी स्थापना,दुर्गाउत्सव असे सण लागोपाठ चालू आहेत.अशा पवित्र धार्मिक हिंदू सणांमध्ये दररोज सकाळी,संध्याकाळी नित्यनेमाने गणेश,मंगळागौरीच्यां मुर्तीसमोर आरती,भजन,कीर्तन प्रवचन,भागवत, रामायण,हरी विजय गायनवादन,वाचन सुरू असताना अचानक विजपुरवठा महावितरण शहर कार्यालय हिमायतनगर कडुन वांरवार खंडित केला जात असुन,विद्युतपुरवठा कोणत्याही क्षणी रात्री – बेरात्री खंडित होतअसुन सध्या गणेशोत्सव असल्याने असे विद्युत पुरवठ्यात खंडित होऊ नये,यासाठी सहाय्यक कार्यकारीअभियंता महावितरण उपविभागीय कार्यालयाला भाजपाकडून निवेदन देण्यात आले त्यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष- आशिषभाऊ सकवान,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष- रामभाऊ सूर्यवंशी,शहराध्यक्ष खंडू चव्हाण,जेष्ठ भाजप कार्यकर्ते कांतागुरु वाळके,युवा मोर्चा शहराध्यक्ष कल्याणसिंह ठाकुर,सेवा सो संचालक राम पाकलवाड,उपशहराध्यक्ष बालाजी ढोणे,सुभाष माने,अजय जाधव, लक्ष्मण चव्हाण,दुर्गेश मंडोजवार, वामनराव पाटील वडगावकर,अनिल माने,सचिन कोमावार,गंगाधर मिरजगावे सर,विनोद दुर्गेकर,ज्ञानेश्र्वर कोरडे यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleलोहारा येथील सर्पमित्र यांनी ६ फुट नागाला जीवदान
Next articleरिमझिंम पावसामुळे पिकांना मिळाले जिवनदान.