Home Breaking News मातंग समाजाने शैक्षणिक प्रगती सोबतच आर्थिक विकासाकडे लक्ष द्यावे:-संताराम तायडे

मातंग समाजाने शैक्षणिक प्रगती सोबतच आर्थिक विकासाकडे लक्ष द्यावे:-संताराम तायडे

खामगाव:- मातंग समाज आजही शैक्षणिक सामाजिक आर्थिक व राजकीय प्रगती पासून वंचित राहिलेला आहे याला कारण म्हणजे मातंग समाजाने शिक्षणाकडे केलेले दुर्लक्ष आणि संघटन उदासीनता हे मुख्य कारण आहे त्याकरिता मातंग समाजाने शैक्षणिक प्रगती साधन्याकरिता हिरीरीणे पुढे आले पाहिजे त्यासोबतच आर्थिक प्रगती होणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे म्हणून मातंग समाजाच्या युवकांनी रोजगारीची संधी शोधतांना व्यवसायाकडे वळावे असे प्रबोधन मातंग समाजाची ज्येष्ठ नेते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमच्या बुलढाणा जिल्हा उत्तर यांच्या विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने मातंग समाज संपर्क व संवाद अभियानाची सुरुवात दि. 02 ऑक्टोंबर 2022 रोजी माटरगाव येथून काढण्यात आली सदर अभियानाचे उद्घाटन करताना संतराम तायडे बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे जिल्हा सरचिटणीस देविदास फुटवाईक होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपती महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व थोर महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्ताविक बुलढाणा जिल्हा अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे अध्यक्ष वामनराव गुडेकर यांनी सोशल फोरमच्या ध्येयधोरणाबाबत मार्गदर्शन केले याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष गजानन सोनवणे रामेश्वर साठे लखन फुटवाईक कु.शिवानी फुटवाईक संतोष तिल्लेराव देविदास फुटवाईक यांची समयोचित भाषणे झाली कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष कृष्णा नाटेकर तर आभार प्रदर्शन सोपान फुटवाईक यांनी केले कार्यक्रमाला खामगाव शहर सचिव अजय नाटेकर जळगाव तालुका अध्यक्ष गजानन म्हस्के युवा आघाडी अध्यक्ष संदीपान सोनवणे एकनाथ तायडे विष्णू फुटवाईक नागोराव फुटवाईक मिठाराम फुटवाईक श्रीराम फुटवाईक रवि भालेराव राजु फुटवाईक सोपान फुटवाईक संदिप फुटवाईक निलेश फुटवाईक हर्षल फुटवाईक शुभम फुटवाईक आदीसह परिसरातील मातंग समाजाचे बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleमृत जनावरे रस्त्यांत टाकल्यामुळे प्रवाशांना दुर्गंधीचा होतोय त्रास.
Next article*हिंदी माध्यमिक विद्यालयात भव्य पालक मेळावा संपन्न*