Home Breaking News डॉ. मनोरमा व प्रा. हरिभाऊ शंकरराव पुंडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,...

डॉ. मनोरमा व प्रा. हरिभाऊ शंकरराव पुंडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बाळापूर येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी

बाळापूर :- स्थानिक डॉ. मनोरमा व प्रा. हरिभाऊ शंकरराव पुंडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बाळापूर येथे माननीय प्राचार्य डॉ. धैर्यवर्धन पुंडकर सर यांच्या मार्गदर्शनामध्ये राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने डॉ. ए. पी. जी. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त ” वाचन प्रेरणा दिन ” साजरा करण्यात आला. या कार्यक्रमा करिता प्रमुख वक्ते म्हणून डॉ. राजेश ओळंबे, डॉ.रवींद्र ढोरे व प्रा. सुनिल देशमुख होते तर अध्यक्ष स्थान IQAC चे Co- Ordinator मा. डॉ.सुनिल उन्हाळे हे होते. विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणुन साजरा केला जातो असे प्रतिपादन डॉ. ओळंबे सरांनी आपल्या भाषणात केलें.अध्यक्षीय भाषांनामध्ये डॉ. उन्हाळे सर यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची संस्कृती रुजवून त्यांच्यामध्ये व्यक्तिमत्व विकास साधावा असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे संचालन रा. से. यो. कार्यक्रमअधिकारी प्रा. पुरुषोत्तम बाठे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. आल्हाद भावसार यांनी केले. या कार्यक्रमा करिता बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Previous articleअबे.. ओबीसी हो बाबासाहेबांचा फोटो लावला का घरात… मंग कधी लावता? प्रा. नितेश कराळे
Next article*चिमुकल्यासह महिलेचा मृत्यू*