Home Breaking News बुलढाण्यात वंचित महिला आघाडीकडुन मणिपूर प्रकरणी आंदोलन

बुलढाण्यात वंचित महिला आघाडीकडुन मणिपूर प्रकरणी आंदोलन

बुलढाणा – मणिपूर येथे महिलांवर केलेल्या हिंसाचार व बलात्कार करणाऱ्या आरोपींना देह दंडाची शिक्षा मिळावी म्हणून वंचित बहुजन महिला आघाडीच्या बुलढाणाच्या वतीने जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंग यांच्या नेतृत्वामध्ये खामगाव ,शेगाव, नांदुरा, संग्रामपूर ,जळगाव जामोद येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

मणिपूरमधील कुकी या आदिवासी जमातीच्या महिलेवर झालेल्या अत्याचाराचा वंचित बहुजन महिला आघाडी निषेध करत आहे. मणिपूर येथे मैत्री कुकी व नागा व इतर आदिवासी जमातीमध्ये गेल्या दोन महिन्यापासून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष आता दंगल जाळपोळ आणि नरसंहारापर्यंत पोहोचला आहे. या हत्याकांडाच्या विरोधात वंचित बहुजन महिला आघाडी आक्रमक झालेले आहे. त्यासाठी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये दिनांक एक आठ 2023 रोजी खामगाव, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव ,जळगाव जामोद येथे तीव्र निषेध आंदोलन केले.

या आंदोलनाला खामगाव मध्ये पार्लमेंटरी बोर्ड सदस्य अशोक भाऊ सोनोने, पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष शरदभाऊ वसातकार, जिल्हा अध्यक्ष गणेशभाऊ चौकसे, महिला जिल्हाध्यक्ष विशाखा ताई सावंग, तालुका अध्यक्ष प्रभाकर वरखेडे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती संघपाल जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेश हेलोडे, भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष दादाराव हेलोडे, अनिल अमलकार, सोनेकर सर, सुनील वाकोडे, संतोष गवई, सुमनबाई थाटे, जया वानखेडे, रमा गवई, रितू गवई, लता गवई, गोकर्ण वानखेडे, उज्वला आराख, सुजाता ठोसरे, अनिता ससाने, पिंकी मिश्रा, चंदा ठोसरे, अनिता तायडे, नंदा मिश्रा, रोशनी शाम दे, सुजाता शाम दे, प्रमिला तायडे, अंजली तायडे, मनीषा तायडे, ज्योती वानखेडे, नंदा साबळे, कोमल तायडे, कुसुम तायडे, पुष्पा इंगळे, रेखा दाभाडे, मनीषा इंगळे, वैशाली इंगळे, सुप्रिया हिवराळे, वनमाला इंगळे, उज्वला इंगळे, दीक्षा इंगळे, रेखा लोखंडे, सुपडाबाई हिवराळे, निशा सावंत, अर्जुन इंगळे, रत्नमाला गवळी, नगीना गोळे , ललिता मोरे, जिजाबाई ताळे, कांताबाई ताळे ,नंदाबाई साबळे, प्रमिला तायडे, निर्मला साबळे, वंदना साबळे, उदेभान साबळे, शामराव तायडे, विजय तायडे, सुजाता वाकोडे, ज्योती वाघ, शांताबाई गवळी, विशाल तायडे, नीता गवई, कल्याण तायडे ,रमेश गवारगुरु, महेंद्र सावंग , तसेच तसेच अनेक महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleआण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथि साजरी
Next articleमहाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी रवि लांडे (पाटील )यांनी आज एका निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी आणि पोलीस स्टेशन बाळापुर येथे एका निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली…