Home Breaking News शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत जाहीर...

शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट :-वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून सेनगाव येथील दिग्गज नेत्यांनी सुनील मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. प्रवेशित सेनगाव येथील अनिरुद्ध उर्फ विक्की अशोकराव देशमुख (काँग्रेस माजी जिल्हा उपाध्यक्ष), गजानन विश्वनाथ देशमुख (आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष) विनायक गणपत पोले (भाजप शाखा अध्यक्ष) आदींनी पक्षात प्रवेश घेतला.

या वेळी उपस्थित हिंगोली चे माजी जिल्हाध्यक्ष
सुरेशजी धोत्रे, अनिल भाऊ कांबळे (जिल्हाध्यक्ष हिंगोली), सुनील मुंदडा (जिल्हा उपाध्यक्ष), डॉ. ॲड. रफी शेख (जिल्हा उपाध्यक्ष), ॲड. सतीश पंडित (जिल्हा सचिव), रफिक कुरेशी (नगरसेवक औंढा), सुनील मोरे( औंढा तालुका महासचिव), आनंद ढेंबरे (औंढा तालुका प्रसिध्दी प्रमुख), अरविंद मुळे (औंढा शहर अध्यक्ष),
बबलू शेख (युवा तालुका उपाध्यक्ष) आदी उपस्थित होते.

Previous articleराजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती आयोजित
Next articleआरपीएफ अधिकाऱ्यांच्या या धाडसी कृत्याचं सर्वत्र कौतुक केलं जातं आहे…