Home Breaking News राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती आयोजित

राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती आयोजित

 31 मे व 1जून निमित्त (रामकुंड अहिल्या घाट ) नियोजन बैठक संपन्न

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर -8983319070

नाशिक (प्रतिनिधी ) हिंदू धर्म रक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव निमित्त आज ज्या अहिल्यादेवींनी बारा ज्योतिर्लिंगाचे जीर्णोद्धार केले प्रत्येक धार्मिक ठिकाणी मंदिरे बांधली,घाट मांडली, जनावरांसाठी पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली बारव, विहिरी जनसामान्यांसाठी बांधून ठेवल्या, मज्जीद, धर्मशाळा, पानवटी तयार केली, इंदूर सारख्या ठिकाणी मावळ प्रांतात राजधानी स्थापन केली महेश्वरीला नर्मदेच्या कडेला घाट आणि मंदिर बांधली चांदवड सारख्या ठिकाणी रंगमहाल , तसेच नासिक जिल्ह्यात संपूर्ण जाण्या येण्यासाठी रस्ते गोरगरिबांसाठी या सर्व व्यवस्था उपलब्ध करून दिल्या अशा या महान कर्तुत्वान प्रशासक महिला राजमाता हिंदू धर्म रक्षक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मोत्सव सोहळा येत्या 31 मे रोजी व 1जून रोजी अहिल्या, घाट रामकुंड, या ठिकाणी साजरा होणार आहे. त्यानिमित्त आज ज्या अहिल्यादेवींनी अहिल्या घाटावरती काशी विश्वेश्वर मंदिर बांधले त्या घाटावरती काशी विश्वेश्वराची दर्शन घेऊन व अहिल्या राम मंदिराचे दर्शन घेऊन बैठकीत सुरुवात केली यामध्ये सर्व जाती धर्मातील व्यक्तींनी सहभाग नोंदवला. यामध्ये जन्मोत्सव निमित्त अनेक विषयांवर ती चर्चा झाली त्यामध्ये 28 मे ते 1 जून यादरम्यान जन्मोत्सव साजरा होणार अशी नियोजन करण्यात आले. प्रत्येक दिवशी सायंकाळी सहा वाजता अहिल्या आरती व गोदा आरती करण्याची नियोजन करण्यात आले. तसेच 31 मे रोजी सायंकाळी सात वाजता अहिल्या आरती व गोदावरीचे नियोजन करून त्यामध्ये प्रमुख उपस्थिती महाराजा यशवंतराव होळकर (तृतीय ) यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच 298 जयंती निमित्त 298 सर्वसाधारण महिला पुरुष जोडपेंच्या हातून या आरतीची नियोजन करण्यात आले त्यामध्ये अनेक संघटना सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच त्या ठिकाणी व्याख्यानाचे नियोजन करण्यात आले आहे.
तसेच एक जून रोजी सायंकाळी 7वाजता अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अहिल्यादेवींच्या कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी, व त्यांच्या कर्तुत्वाची आठवण करून देण्यासाठी प्रमुख व्याख्याते लक्ष्मण नजान सर (होळकरशाहीचे इतिहासकार ) रामदास काळे, (होळकर शाही इतिहासकार )तसेच प्रमुख आकर्षक असणारे महाराजा यशवंतराव होळकर, पॅरिस ते नाशिक आपल्या सर्वांसाठी मुख्य आकर्षक असणार आहेत, त्याचबरोबर जहागीरदार अमरजीत दादा बारगळ, स्वप्निल राजे होळकर, राज्याचे मंत्री महोदय नाशिकचे पालकमंत्री दादासाहेब भुसे,सुधीर भाऊ देंडगे, रामभाऊ लांडे, तसेच अनेक प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत व जनतेच्या सहभागातून हा जन्मोत्सव सोहळा पार पडणार असे या बैठकीत नियोजन करण्यात आले.
या बैठकीत अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव होण्यासाठी सर्वसाधारण व खालच्या स्तरावर तील जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी या जन्मोत्सव्वाची तयारी चालू केली यामध्ये अनेक स्तरावरील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते यामध्ये होळकरशाहीचे सरदार घराण्याची वंशज भाऊसाहेब, राजोळे,सामाजिक कार्यकर्ते देविदास भडांगे, प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस समाधान बागल, मल्हार महासंघाचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सपनार, धनंजय वानले हेमंत शिंदे, सर,सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश धापसे, प्रशांत बागल सर अमोल गजभार सर प्रहार शहराध्यक्ष श्याम गोसावी,देवराम भाऊ रोकडे राजाभाऊ बादाड, नवनाथ भाऊ शिंदे भूषण भाऊ जाधव, प्रवीण जाधव, रवींद्र वानले,ऋषिकेश शिंदे श्रीकांत राहटाळ, बाबुराव हिंगे पाटील गोविंद बारहाते,पुष्कर कदम म्हशे अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते
यामध्ये नियोजन समितीची स्थापना करण्यात आली त्यामध्ये सर्वानुमते अध्यक्ष म्हणून ऋषिकेश धापसे यांचे निवड करण्यात आली उपाध्यक्ष म्हणून ऋषिकेश शिंदे, व भूषण जाधव यांची निवड करण्यात आली स्वागत अध्यक्ष म्हणून अमोल गजभार सर व प्रशांत बागल सर, विजय काळदाते, कार्याध्यक्ष म्हणून श्याम गोसावी देवराम भाऊ रोकडे, रवींद्र वानले बाबुराव हिंगे गोविंद बाराहाते श्रीकांत राहतळ, वैभव रोकडे, राजाभाऊ बादाड, नवनाथ भाऊ शिंदे, व प्रसिद्धी प्रमुख म्हणून धनंजय वानले व हेमंत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली.
हा जन्मोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी उपस्थित सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी, वनाशिक शहर व ग्रामीण भागातील जनतेने सहभागी व्हावे यासाठी सर्वानुमते नियोजन करण्यात आले. तसेच अध्यक्ष ऋषिकेश धापसे यांनी ग्रामीण भाग व शहरी भाग जनतेला आव्हान करण्यात आले या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहून या सोहळ्याचा वया भव्य दिव्य सोहळ्यात सहभागी होऊन या सोहळ्याचा भव्य दिव्यता होण्याची साक्षीदार व्हावे असे आवाहन करण्यात आले.

Previous articleजिल्ह्यातील राजकारणात पेरकेवाड समाज बांधवांनी घेतली भरारी…
Next articleशेकडो कार्यकर्त्यांनी घेतला श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश