Home Breaking News अवैद्य वाळु ट्रॅक्टर वाहतुकवर कारवाई

अवैद्य वाळु ट्रॅक्टर वाहतुकवर कारवाई

तहसीलदार यांची कारवाई ट्रॅक्टर मालकास दंड

योगेश घायवट भूमिराजा

वाडेगाव:- बाळापूर तहसिल अंतर्गत येत असलेल्या वाडेगाव परिसरात शनिवार रोजी तहसीलदार दौऱ्यावर असतांना सकाळी १० च्या सुमारास अवैध वाळू ट्रॅक्टर वाहतुकीवर कारवाई करण्यात आली आहे .
मिळालेल्या माहितीनुसार १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा च्या दरम्यान चिंचोली गणु ते तांदळी तर्फ तुलंगा या रस्त्याने ट्रॅक्टर क्र एम एच ३० ए जे ०२९५ ट्रॉली क्र एम एच ३० टी ६्३७० या वाहनाने ०१ ब्रास विनापरवाना वाळु हे गौण खनिज वाहनुक करीत असतांना मौजे तांदळी तर्फ तुलंगा येथे आढळुन आले असता तहसिलदार ऐहसानोद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी बि जी रबडे व कोतवाल गिरधर घोगरे यांनी संयुक्त कारवाई करून ट्रॅक्टर मालकास १, ३२, ३५७ रूपये दंड प्रस्तावित केला.पुढील कारवाई बाळापूर तहसिल करीत आहे..

Previous articleपुलाचे काम निकृष्ट दर्जाचे
Next articleवाडेगावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण काढण्याचे आदेश