Home Breaking News पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पुष्परत्न साहित्य समूह, प्रथम वर्धापन दिन सोहळा व...

पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पुष्परत्न साहित्य समूह, प्रथम वर्धापन दिन सोहळा व सन्मान सोहळा अतिशय उत्साहात संपन्न

एक दिवसीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर -8983319070

रविवार दिनांक 4 जून 2023 रोजी मराठा विद्या प्रसारक समाजाचे लोकनेते मालोजीराव मोगल व्यवस्थापन संशोधन व तंत्रज्ञान संस्था रावसाहेब थोरात सभागृहाच्या समोर गंगापूर रोड नाशिक येथे संपन्न झाले.

एकदिवसीय मराठी साहित्य या *संमेलनाचे संमेलनाध्यक्ष मा. उत्तम कांबळे*( ज्येष्ठ साहित्यिक,संपादक,कवी) उपस्थित होते तर *प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री मा.मेघा घाडगे* *मा.बाबासाहेब सौदागर*( मराठी चित्रपट पटकथा लेखक, अभिनेते) *प्रा.डॉ.चेतना सोनकांबळे*
(आंतरविद्याशाखा, अधिष्ठाता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छ. संभाजी नगर) असे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन झाले. त्यानंतर आलेल्या पाहुण्यांना मानाची शाल,आकर्षक सन्मान चिन्ह सन्मानपत्र व ग्रंथ देऊन यथोचित पुष्परत्न साहित्य समूहाचे अध्यक्ष प्रा. डॉ.आनंद रत्नाकर आहिरे यांनी सन्मान केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.आनंद रत्नाकर आहिरे* यांनी केले पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही 2016 पासून कार्यरत आहे विविध सामाजिक व शैक्षणिक कार्य बरोबरच पुष्परत्न साहित्य समूह एक वर्षापासून नाशिक मध्ये स्थापन केला व जागतिक कवी व साहित्यिकांना हक्काचे विचारपीठ मिळावे म्हणून एक वर्षात हजारोच्या वरती कवी कवियत्री या समूहात सामील झाले व प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन केले जाते व विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व विशेष साहित्यिक क्षेत्रातही दैदिप्यमान योगदान देणाऱ्या साहित्यिकांचा सन्मान सोहळा ही आयोजित केला जातो. पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व पुष्परत्न साहित्य समूह विविध कार्य करतो याचे विविध कार्यक्रमाचा आराखडाच त्यांनी सांगितला.

प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. चेतना सोनकांबळे अधिष्ठाता आंतरविद्या शाखा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर* यांनी पुष्परत्न साहित्यसमूह हा महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वपूर्ण समूह आहे त्याचे विविध कार्यक्रम मी बघत असते व प्रा. डॉक्टर आनंद आहिरे हे वैविध्यपूर्ण ज्ञानाचे भांडार आहे व्यवस्थापन तसेच शैक्षणिक क्षेत्रात उंची घातली असून समाज व साहित्यिकांना हक्काचे विचारपीठ मिळावे म्हणून नेहमी झटत असतात.
सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री मेघा घाडगे* यांनी म्हटले की मला प्रमुख पाहुणे व आदर्श अभिनेत्री पुरस्कार या संस्थेने जो बहाल केला त्यासाठी या संस्थेचे मी आभार मानते व खरोखरच कलावंताची दखल घेणारी ही प्रामाणिकपणे संस्था आहे. सध्या चित्रपट क्षेत्रामध्ये गटबाजी सुरू आहे पण आम्ही अतिशय आमच्या कलेशी एकनिष्ठ आहोत त्याचा विचार करून या या संस्थेने जो पुरस्कार जाहीर केला त्याबद्दल मी या संस्थेचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते व प्रा.डॉ.आनंद आहिरे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे हेही त्यांनी नमूद केले.

मा.बाबासाहेब सौदागर मराठी चित्रपट गीतकार व पटकथा लेखक* यांनी प्रा.डॉ. आनंद आहिरे यांनी पुष्परत्न साहित्यसमूहाचा प्रथम वर्धापन दिन सोहळा ठेवून अतिशय योग्य काम केलेले आहे कारण की कलावंत साहित्यिक कवी यांना कुठेतरी समाजात मान सन्मान मिळावा त्यासाठी पुष्परत्न साहित्य हे एक हक्काचे विद्यापीठ दिसते. प्रा. डॉ.आनंद आहिरे यांच्या कार्याला खूप शुभेच्छा दिल्या.
संमेलन अध्यक्ष माननीय उत्तम कांबळे* यांनी अगोदर प्रा.आनंद आहिरे यांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा दिल्या कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात महिन्याच्या पहिल्या रविवारी व आज पुष्परत्न साहित्य समूहाच्या प्रथम वर्धापन दिनी इतक्या मोठ्या प्रमाणात कवी कवयित्रींना एकत्रित बांधणे ही मोठी जबाबदारी आहे आणि ही पार पाडणे हे मोठे कौशल्य आहे ते आहिरे नेहमी करतात तसेच कवी कलावंत साहित्यिक हे अत्यंत महत्त्वाचे आहेत तसेच नारायण सुर्वे कुसुमाग्रज बाबुराव बागुल या कवींचे महत्त्वाचे योगदान उत्तम कांबळे यांनी नमूद केले. तसेच हे नारायण या कवितेचे काव्य वाचन त्यांनी करून दाखवले.

ज्येष्ठ साहित्यिक लेखक कवी उत्तम कांबळे यांना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुरस्काराचे स्वरूप रोख ५००० हजार रुपये, मानाची शाल, आकर्षक सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ व मेडल असे होते*. तर *सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री मेघा घाडगे यांना आदर्श अभिनेत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुरस्काराचे स्वरूप ररोख ५००० रुपये, आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,मानाची शाल व मेडल असे होते*.
मान्यवरांच्या शुभ हस्ते विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या कार्यवीरांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. त्यामध्ये माननीय कवयित्री शोभा वेले नागपूर- (पुष्परत्न काव्य गौरव) सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय विकास भिंगारदिवे कल्याण- (आदर्श प्रशासकीय अधिकारी) माननीय एडवोकेट दिलीप वाळंज कल्याण-( महाराष्ट्र भूषण)माननीय कवयित्री क्रांती वेंडे साक्री:-( पुष्परत्न काव्य गौरव)कवयित्री माधुरी अमृतकार सटाणा- (पुष्परत्न काव्य गौरव)कवयित्री रूपाली शिंपी नाशिक- (पुष्परत्न काव्य गौरव)कवयित्री ज्योती इंगोले परभणी-( पुष्परत्न काव्य गौरव)प्रा. आशा पाटील नाशिक-( पुष्परत्न काव्य गौरव)मा. अश्विनी सुरोशी कल्याण- (समाजभूषण)कवयित्री पुष्पा साळवे जळगाव- (पुष्परत्न काव्य गौरव) कवियत्री साधना कपाळे नागपूर (पुष्परत्न काव्य गौरव) मा. सुनील म्हसकर वाशिंद (पुष्परत्न काव्य गौरव) मा. डॉ.रागिनी आहेर (समाजभूषण) व मा.सरिता खोबरे अमरावती- (समाजभूषण)या व इतर दैदीप्यमान कार्य करणाऱ्या कार्यवीरांना मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे *सुप्रसिद्ध अभिनेते मा.बाबासाहेब सौदागर यांचा संपूर्ण जगभर गाजत असलेला कार्यक्रम *माझ्या गाण्याची जन्म कथा* ही मुलाखत ज्येष्ठ कवयित्री राजश्री सोले पुणे यांनी घेतली,अतिशय बहारदारपणे संपन्न झाली त्यानंतर महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून येणाऱ्या कवी कवयित्रींचे *राज्यस्तरीय कवी संमेलनाचे* ही आयोजन केले होते महाराष्ट्रातील 136 च्या वरती कवी कवयित्री यांनी आपल्या बहारदार कविता सादर केल्या. परभणी,नागपूर, कोल्हापूर,मुंबई,पुणे, रायगड, धुळे,जळगाव,नंदुरबार, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी,अमरावती व नाशिक मधील विविध तालुक्यातील कवी, कवयित्री, प्रकाशक,अभ्यासक, साहित्यिक, वाचक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय नियोजन पूर्ण मा. मनीषा कापुरे नाशिक यांनी केले तर राज्यस्तरीय कवी संमेलनाचे सूत्रसंचालन प्रा.रोहित जाधव कल्याण यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन पुष्परत्न साहित्यसमूह अध्यक्ष प्रा. डॉ.आनंद रत्नाकर आहिरे नाशिक यांनी केले.

Previous articleपर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक देवा तांबे सर यांच्या उपस्थितीमध्ये समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, वाचा
Next articleराजवाडीफाटा ते पिंपळगाव रस्त्यांची दयनीय अवस्था.