Home Breaking News खामगांवच्या जनुना तलावात सापडला युवकाचा मृतदेह!

खामगांवच्या जनुना तलावात सापडला युवकाचा मृतदेह!

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी खामगाव

खामगाव:-१६ जुन रोजी सकाळी जनुना तलावात युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.फरशीपुरा , खामगाव येथील योगेश देविदास चोपडे वय ३४ असे मृतकाचे नाव आहे.तलावाच्या काठावर चपला काढून ठेवल्याने तलावात कुणीतरी आत्महत्या केल्याचे नागरीकांना संशय आला.घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.आणि शोध मोहीम सुरू केली असताना युवकाचा मृतदेह आढळला.दरम्यान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतदेह तपासणी साठी सामान्य रुग्णालयात पाठविला आहे.

Previous articleआदिवासी मजुरावर अस्वलाचा हल्ला
Next articleरोशन राहुल कांबळे चे दहावीत ९५.६० % घेऊन उज्ज्वल यश संपादन