Home Breaking News स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

👉 जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांचे आवाहन

जिल्हा संपादक नांदेड
दि. 30 नोव्हेंबर 2022:-

स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या अंमलबजावणीसाठी सन 2022-23 मध्ये शासनाने मान्यता दिली आहे. इच्छुक पात्र लाभार्थ्यंनी या योजनेअंतर्गत फळबाग लागवडी करीता किमान 0.20 हेक्टर ते कमाल 6.00 हेक्टर क्षेत्र अनुज्ञेय आहे. कमाल क्षेत्र मर्यादेत लाभार्थ्यांच्या इच्छेनुसार एकापेक्षा जास्त फळपिक लागवड करता येईल. लाभार्थ्यांनी यापूर्वी फळबाग लागवड करण्यासाठी इतर योजनेअंतर्गत लाभ घेतला असल्यास लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उर्वरित मर्यादित लाभार्थी पात्र राहील. या योजनेअंतर्गत पुढील बहुवार्षिक फळपिकांचा आंबा, पेरू, डाळींब, लिंबू, मोसंबी, संत्रा, सीताफळ, आवळा, चिंच, जांभुळ, अंजीर व चिकु यांचा समावेश करण्यात आला आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी पात्रता

मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड योजनेतून अपात्र असणारे शेतकरी यांना वैयक्तिक शेतकऱ्यांच लाभ घेता येईल . शेतकऱ्यांच्या स्वत च्या नावे सात बारा व आठ अ चा उतारा असणे आवश्यक आहे. सात बारा उताऱ्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्रक राहील. जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास सातबारा उताराऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर कुळाचा नावे संमती पत्र आवश्यक राहील.

अर्ज नोंदणी प्रक्रिया

सर्व इच्छुक शेतऱ्यांनी महाडीबीटी http:/mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी आणि आपल्या आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण त्याचवेळी करणे बंधनकारक राहील.या योजने अंतर्गत अनुदान मंजुर मापदंडाप्रमाणे देय असल्यामुळे अर्ज करताना शेतकऱ्यांनी सात बारा आठ अ नुसार क्षेत्र सर्वे नंबर फळपिकांचे नाव, प्रकार, कलमे, रोपे, लागवड अंतराचे परिणाम ( मीटरमध्ये ) इत्यादी माहिती शेतकऱ्यांनी अचूक भरावी.महाडीबीटी पोर्टल सुरू झाल्यापासून योजने अंतर्गत मागील प्राप्त अर्ज बुधवार दिनांक 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत प्राप्त होणारे अर्ज आर्थिक लक्षांकाच्या अधिन राहुन संगणकीय सोडतीव्दारे लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. अर्जासंबंधीच्या माहिती http:/mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.तसेच अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा . या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी आर.बी.चलवदे यांनी केले आहे.

Previous articleसंभापूर ग्रामपंचायत च्या मासीक सभेत गोंधळ..!
Next articleभूमिहीन व अतिक्रमणधारकांच्या पाठीशी वंचीत बहुजन आघाडीत अतिक्रमण धारकांनी संपर्क साधावा.