Home Breaking News 🌹 ” आयुष्य” 🌹

🌹 ” आयुष्य” 🌹

✍️ माझ्या दृष्टीतून….

या पृथ्वीतलावर जन्म घेतलेल्या प्रत्येक प्राण्याला, पक्षाला, मानवाला सुंदर जिवण जगण्याचा अधिकार त्या सर्वक्षेष्ठ परमेश्वराने दिला आहे. म्हणूनच काही जण म्हणतात ” जिवण खूप सुंदर आहे”. या वाक्याचा अर्थ असा जिवणात आलेल्या प्रत्येक अडीअडचणीवर मात करून, दुःखाच्या हिंदोळ्यावर आनंदाची चादर ओढून मार्गक्रमण करत राहणे. पण धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला वाटते आपण धनसंपत्ती, पैसा, ऐश्वर्य अधिक मिळवावे. तो सारखा धावत धावत असतो. सुखीसंसार चालवण्यासाठी पैश्याची नितांत गरज आहे. हेही एका दृष्टीने बरोबर आहे. पण ख-या आयुष्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी “आवड असलेली कामे करण्यापेक्षा प्रत्येक काम आवडीने करावे” निश्चीतच आयुष्यात मिळालेल्या आनंदाला पारावार उरत नाही.
बालपणीच्या आठवणीचा आनंद अविस्मरणीय हा आनंद असतो. तसाच तारुण्यात पदार्पण केल्यानंतर त्याहुनही अधिक आनंद मिळतो. परंतु काही मनाला भावणा-या भावणीक वासणेवर अंकुश ठेवावा लागतो. योग्यवेळी योग्य सल्ला मिळविण्यासाठी प्रचंड पुस्तके वाचावी लागतात. मन थकुन थकुन, भागाव एवढा प्रचंड अभ्यास करावा लागतो. अथांग ज्ञानाच्या सागरात स्वतःला बुडवुन यशाचे मोती शोधले तर, उभे आयुष्य साखरे सारखे गोड वाटायला लागाव. चांगले मित्र, महापुरुषांची चारीत्रे वाचावी लागतात, समाजातील प्रतिभावान, आदर्श व्यक्ति, यांची सतसंगत धरावी लागते. वेड्या वाकड्या,खुळचट, कपटी, सतत त्रास देणारी, निंदा नालस्ती करणारी माणस उभ्या आयुष्यात बरीच भेटतात. पण त्यांना आपलच करुन त्यांची मन जिंकावी लागतात. त्यावेळी आपल्या तल्लख बुद्धीचे कौशल्य वापरावे लागते. ज्ञानाची शिदोरी सोबत बांधावी लागते. तेंव्हा समाजातील प्रत्येकाला आपण जिथे अनुउपस्थित राहतो. तिथे आपल्याविषयी वाटायला पाहिजे. नाही तो व्यक्ती खुपच चांगला आहे. स्वतःच्या ह्रदयातुन खळखळून भरभरून भरलेले प्रेम ओसंडून ठेवल्यास कुठेही जा …. “ना भय कुणाची ना भिती” असं वाटतं लागतं..
प्रचंड आत्मविश्वास निर्माण करुन या सर्व गोष्टीवर विजय मिळवत असतांनाच आपले निरोगी आरोग्य राहण्यासाठी व्यायाम, प्राणायम, योग्य आहार, सतत वाचन, लिखाण करणे, मुलाबाळांवर संस्कार करणे, मुलाबाळांना दर्जेदार शिक्षण देणे. अश्या एक नाही अनेक बाबीवर कटाक्षाने लक्ष द्यावे लागते. चेहऱ्यावर स्मित हास्य, गोड वाचाळ वाणी, विनम्रपणे वागणे, आदरयुक्त बोलणे, चुकल्यावर क्षमा मागणे याही गोष्टी आयुष्याला चांगले वळण लावतात. आपले चांगले विचार समाजापर्यंत नेण्यासाठी अंगी असलेल्या कला, गुणांना वाव द्यावा लागतो. गर्दीच्या ठिकाणी एखादेवेळी आपण गेलो ना… तेथील समुहाला वाटले पाहिजे की, आपल्या हक्काचा माणुस आला. अचानक एखाद्या प्रसंगी अंगी असलेल्या कलेचा वापर करून, उपस्थितीची मने जिंकावी लागतात. प्रत्येकाच्या ह्रदयात घर करुन बसणे. म्हणजे उभ्या आयुष्यात जिवणात आनंद पाहतो आहे. तुर्तास एवढेच……..
✍️ ….
आपलाच…….
मारोती अक्कलवाड पाटील सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
मोबाईल- 9763126813

Previous articleके. व्ही. एन.नाईक महाविद्यालया त क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांच्या पुण्यतिथि निमित्त त्यांच्या समग्र कार्याला व्याख्याना द्वारे अभिवादन
Next articleमहावितरण विभागाला संभाजी ब्रिगेडचा दणका…… बालाजी ढोणे