Home Breaking News के. व्ही. एन.नाईक महाविद्यालया त क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांच्या पुण्यतिथि निमित्त...

के. व्ही. एन.नाईक महाविद्यालया त क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांच्या पुण्यतिथि निमित्त त्यांच्या समग्र कार्याला व्याख्याना द्वारे अभिवादन

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भुमीराजा मो. नंबर – 8983319070

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक हे राष्ट्रीय चळवळीतील नेते व वंचित उपेक्षित समाज घटकांचे नेते होते, या लोकनेत्याच्या स्मरण समाजाला कायम स्वरुपी राहावे व नवीन पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी आणि त्याच्या विषयी आ दर भाव व्यक्त व्हावा यासाठी या महान क्रांतिवीरांच्या 54 व्या पुण्यतिथि निमित्त नाशिक येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्था संचलित कला, वाणिज्य आणि सायन्स महाविद्यालयाच्या प्रांगणात अभिवादन कार्यक्रम आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी माजी आमदार ऐड. विलास लोणीरी यांना प्रमुख व्याख्याते म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्या अध्यक्षते खाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. के. व्ही. एन. नाईक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी संस्थेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा विश्वस्थ दामोधर आण्णा मानकर, संस्थेचे उपाध्यक्ष ऐड. पी. आर. गीते यांनी आपल्या मनोगतातून क्रांतिवीरांच्या कार्याला उजाळा दिला.
अध्यक्ष मनोगत व्यक्त करते वेळी संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे म्हणाले की, ” क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांचे कार्य नव्या पिढ़ीपर्यंत झीरपावे, हा हेतू या पुण्यतिथिच्या कार्यक्रमा मागे आहे,तसेच त्यांच्या राष्ट्रउभारणीच्या कार्याचा आदर्श समाजाने व तरुण पिढ़ीने डोळ्या समोर ठेवने आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.
या प्रसंगी संस्थेचे सुभाषराव कराड, दिगंबर गीते, भास्कर सोनवणे,संचालक विठोबा फड़, सुधाकर कराड, तुळशिराम विंचू, संचालिका शोभा बोड़के, विष्णुपंथ नाग, विलास आव्हाड, सुरेश घुगे, मंगेश नागरे, रामनाथ बोड़के, वसंतराव धात्रक, प्रभाकर धात्रक, रमाकांत कराड, विजय भाबड, नंदू वराडे, प्रकाश चकोर, विट्ठलराव चाटे, मंजूषाताई दराडे, माधुरी पालवे, शिक्षणाधिकारी मोहन चक़ोर, प्राचार्य डॉ. राजेंद्र सांगळे, डॉ. कैलास चंद्रात्रे, प्राचार्य अविनाश दरेकर, प्राचार्य संजय सानप, प्राचार्य प्रदीप सांगळे, प्राचार्य बोड़के, मुख्याध्या पक कल्पना धात्रक, मुख्याध्यापक घोलप, उपप्राचार्य पूर्णिमा बोड़के, डॉ. बाळासाहेब चकोर, यासहशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विभागप्रमुख प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षका, शिक्षकेतर कर्मचारी, यासह संस्थेचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आभिवादन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शरद काकड तर आभार प्रदर्शन संस्थेचे सह सरचिटणिस ऐड. तानाजी जायभावे यांनी केले.

Previous articleगावच्या ग्रामसेवकाला संरपंचाचे अभय!
Next article🌹 ” आयुष्य” 🌹