Home Breaking News नवोदय विद्यालय प्रवेश फॉर्म भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवा फॉर्म भरण्याची मुदत...

नवोदय विद्यालय प्रवेश फॉर्म भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवा फॉर्म भरण्याची मुदत वाढवून द्या : अध्यापकभारती

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

नाशिक (प्रतिनिधी)
नवोदय विद्यालय प्रवेश फॉर्म भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी त्वरित दुरुस्त करून, फॉर्म भरण्याची मुदत वाढून मिळणे बाबत तातडीने निर्णय घ्यावा असे आवाहन अध्यापकभारतीने केंद्र व राज्य सरकरकडे केले आहे.

जवाहर नवोदय विद्यालय ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरतांना अनेक अडचणी येत असून तांत्रिक अडचणी,वेबसाईट अडचणी मुले फॉर्म सबमिट होत नाही.सदर फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२३ आहे,अनेक जिल्ह्यातील विविध तालूक्यातील नवोदय प्रवेश फॉर्म ता तांत्रिक अडचणीमुळे खूप कमी जणांनी भरलेले आहेत याचे एकमेव कारण म्हणजे form भरताना येणाऱ्या server down च्या अडचणी आहेत.अजून अनेक ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत पण server down च्या अडचणीमुळे form भरण्यास वेळ लागत आहे.महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांनी नवोदय प्रवेश फॉर्म भरताना येणारी अडचण लक्षात आणून घेऊन form भरण्याची मुदत दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ वाढवून द्यावी असे निवेदन आपणास करत आहोत.गरजू,होतकरू ग्रामीण कष्टकरी शेतकरी शेतमजूर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात यावी असे आवाहन राष्ट्रीय बालक-विद्यार्थी, पालक,शिक्षक,शिक्षण प्रशिक्षण संस्था अध्यापकभारतीचे संस्थापक शरद शेजवळ निवेदनाद्वारे केली आहे.
शिक्षक,पालक व मुलांचा form भरण्यासाठी रात्र – दिवस न पाहता वेळ मिळेल तेव्हा कधी पण प्रयत्न करत आहेत परंतु पूर्ण माहिती भरली जाते आता form submit होणार म्हटले की सर्व process परत मूळ पदावर येते आहे. जिल्हाधिकर्यांनी सदर बाबीकडे विनाविलंब लक्ष घालून मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी अध्यापकभारती च्या वतीने शरद शेजवळ,वनिता सरोदे,विनोद पानसरे,गणेश गांगुर्डे, नितीन केवटे,के.एस.केवटे,रोहित पगारे,भारती बागुल,जीवन पान पाटील,नुमान शेख,एस.एन. वाघ,सुभाष वाघेरे,महेंद्र गायकवाड, सुरेश खळे,राजरत्न वाहुळ यांनी केली आहे.

Previous articleहिंगणा उमरा येथे राबविण्यात आली ‘स्पर्श कुष्ठरोग आणि क्षयरोग जनजागृती अभियान’ मोहिम..!!
Next articleआमदार आकाशदादा फुंडकर यांचा वाढदिवस समाजपयोगी उपक्रमांनी साजरा करावा.