Home Breaking News नांदेड_किनवट_राष्ट्रीय_महामार्गाचे काम संथ गतीने प्रशासनाचे दुर्लक्ष..

नांदेड_किनवट_राष्ट्रीय_महामार्गाचे काम संथ गतीने प्रशासनाचे दुर्लक्ष..

अंगद सुरोशे हिमायतनगर/प्रतिनीधी
मौजे, खैरगाव (ज) ता. हिमायतनगर, जि.नांदेड
येथील पुलाच काम अत्यंत कासवगतीने सुरु.
कंत्राटदारांच्या नाकर्तेपणामुळे मागिल 3 वर्षापासून
रखडलेल्या या पुलाचं_काम ऐन पावसाळ्याच्या
तोंडावर सुद्धा पुर्ण होत नाहीये,,,वारंवार विनंती करुन
सुद्धा या कामाची गती वाढत नसून या पुलाच्या कामामुळे
ये – जा करणाऱ्या अनेक प्रवाशांना, गावकरी, मायबाप शेतकरी वर्गाला धुळीचं त्रास सहन करावा लागतो
आहे, याच रखडलेल्या पुलाच्या कामांमुळे याच पुला
लगत असलेल्या खैरगाव (ज) गावाला पुरवठा होत
असलेल्या विहीरीतलं तळाशी पोहचलेलं आहे या संपूर्ण
गावाला धुळी सह पिण्याच्या पाण्याचा पण भयंकर त्रास जाणवतो आहे, यामुळे प्रशासकीय यंत्रणेला
व पुणाला काम करणाऱ्या कंत्राटदारांना नम्रपणे विनंती
करतो कि लवकरात लवकर आपण या पुलाचं रखडलेलं
काम व गावकरी मायबाप जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा
विषय मार्गी लावावा, अन्यथा शासकीय कंत्राटदारांच्या व प्रशासनाच्या या निष्क्रियतेच्या विरोधात त्रस्त असलेली
सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरुन मोठे आंदोलन उभं
केल्याशिवाय राहणार नाही.
आपण लवकरात लवकर काम पूर्ण करावे,,
अन्यथा करण्यात येईल त्या सगळ्या
बाबींसाठी तयार रहावे.आसे आव्हान येथील .दिनेश अशोकराव राठोड(खैरगावकर)
बंजारा युवा टायगर फोर्स
तालुका अध्यक्ष हिमायतनगर

Previous articleनिधन वार्ता
Next articleओबीसी महासभा राजकीय दिशा ठरवणार