Home Breaking News खामगाव- अकोला रस्त्यावरील रस्ता अपघातात एक जण जागीच ठार, तीन जखमी

खामगाव- अकोला रस्त्यावरील रस्ता अपघातात एक जण जागीच ठार, तीन जखमी

अकोला येथून खामगावकडे दुचाकीवर स्थळ पाहण्यासाठी येत असताना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुसर्या वाहनावर धडकल्याने झालेल्या अपघातात एक ६० वर्षीय इसम जागीच ठार झाला.

 उमेश मोरखडे खामगाव प्रतिनिधी भूमीराजा

खामगाव – अकोला येथून खामगावकडे दुचाकीवर स्थळ पाहण्यासाठी येत असताना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुसर्या वाहनावर धडकल्याने झालेल्या अपघातात एक ६० वर्षीय इसम जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी सकाळी अकरा वाजता दरम्यान टेंभूर्णा शिवारातील एका पेट्रोलपंपासमोर घडली.

याबाबत प्राप्त माहितीनुसार अकोला येथील पाच जण दोन दुचाकीने खामगावकडे येत होते. दरम्यान, टेंभूर्णा शिवारातील एका पेट्रोलपंपासमोर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन्ही दुचाकी अनियंत्रित होऊन समोरील वाहनांवर जाऊन धडकल्या. यात एमएच ३० बीएस २२६५ या क्रमांकाच्या दुचाकीसह दुसरीही दुचाकी समोरील वाहनांवर जाऊन आदळल्याने दुचाकीवरील वासुदेव वानखडे वय ६० रा. धानोरा जि. अकोला यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर संदेश देवराव तायडे, सविता देवराव तायडे दोघेही रा. मलकापूर जि. अकोला आणि संगीता सदानंद दामोदर रा. भौरद जि. अकोला जखमी झाले. तर एक युवक किरकोळ जखमी झाला.

घटनेनंतर नागरिकांनी अपघातग्रस्तांना तातडीने खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासणीअंती वासुदेव वानखडे यांना मृत घोषित केले. पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Previous articleअवकाळी पावसामुळे हिमायतनगर येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान.
Next articleचौथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाचे उद्घाटन*