Home Breaking News महाराजा यशवंतराव होळकर शौर्य यात्रेचे मनमाड येथे उत्साह व जल्लोषात स्वागत

महाराजा यशवंतराव होळकर शौर्य यात्रेचे मनमाड येथे उत्साह व जल्लोषात स्वागत

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़ मो. नंबर – 8983319070

महाराजा यशवंतराव होळकर यांच्या 14 फूट आश्वारुढ पुतळ्याची स्थापना इंदूर येथे करण्यात येणार आहे. हा आश्वारुढ पुतळा पुणे येथे बन वन्यात आला असून, पुणे ते इंदूर अशी शौर्ययात्रा या निमित्ताने काढन्यात आली. मनमाड शहरात या यात्रेचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले.
मालेगाव चैाफुली येथे सर्व समाज बांधव व नांदगांव मनमाड मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांच्या वतीने या यात्रेचे स्वागत करण्यात आले. भारताचा नेपोलीयन असलेल्या व इंग्रजाना सलग 18 वेळा पराजित करणाऱ्या महाराज यशवंतराव होळकर यांच्या पुतळयाची स्थापना इंदूर येथे करण्या साठी पुणे ते इंदूर अ शा मार्गाने शौर्य यात्रा जात असून या यात्रेचे स्वागत त्या त्या परिसरातील समाज बांधवा तर्फे केले जात आहे.
येवला येथून या यात्रेचे मनमाड शहरात आगमन झाले. त्यावेळी ढ़ोल ताशांच्या गजरात या यात्रेचे स्वागत करण्यात आले. महाराजा यशवंतराव होळकर यांच्या आश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन पुजान करण्यात आले. त्यात सहभागी झाले ल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
मल्हार सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणिस मचिंन्द्र बिडगर, मनमाडचे माजी नगराध्यक्षा साईंनाथ गिडगे, माजी नगरसेविका सविता गि डगे, डॉ. संगीता हाके आदी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Previous articleदारू विक्रेत्यांनी केली पत्रकारास मारहाण……
Next articleपोलिस अधिक्षक मा. सुनील कडासने साहेब ” समाज भूषण पुरस्काराने ” सन्मानित. – डॉ. संघर्ष सावळे