Home Breaking News अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री चौंड़ीत येणार

अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री चौंड़ीत येणार

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे विशेष निमंत्रित

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर असे नामांतर करण्याची अधिकृत घोषणा जाहीर होण्याची शक्यता

31 मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंती मोहत्सवास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या जयंती मोहत्सवासाठी केंद्रिय उडडा न मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व होळकर घराण्यचे वंशज तिस रे यशवंतराव होळकर यांना विशेष निमंत्रित केले गेले आहे, अशी माहिती भाजपा प्रवक्ते व आमदार राम शिंदे यांनी दिली.
नगर जिल्हयातील चैा डी तालुका जामखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळ कर यांचे जन्मस्थळ आहे. या 31 मे ला जयंती महोत्सव मोठ्या धुम धडाक्यात साजरा होणार आहे. या साठी शासनाने 50 लक्ष रुपये निधीची तरतूद केली आहे.
या जन्मोत्सवाच्या आयोजना साठी आमदार राम शिंदे व माजी मंत्री अा ण्णा साहेब डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख आधिका-यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच पार पडली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगर जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व होळकर घराण्याचे वंशज य्रशवंत राजे होळकर यांच्या उपस्थित होणाऱ्या या कार्यक्रमा मध्ये अहमदनगर जिल्हयाचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळ कर नगर असे नामाकरण संदर्भात काही अधिकृत घोषणा होणार का? याकडे अवघ्या समाज बांधवांचे लक्ष लागले आहे.

Previous article॥आई॥
Next articleपतीचं डोकं होतं शंकासदनी;एकाला पाठवलं यमसदनी…