Home Breaking News जिल्ह्यातील राजकारणात पेरकेवाड समाज बांधवांनी घेतली भरारी…

जिल्ह्यातील राजकारणात पेरकेवाड समाज बांधवांनी घेतली भरारी…

👉 व्यक्तीविशेष…

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 18 मे 2023

समाजाचे आपण काही देणे लागतो. हाच ध्यास मनाशी धरुन घेतला वसा टाकायचा नाही म्हणुन… नांदेड जिल्हा परिषदचे मा. अध्यक्ष बाबारावजी एंबडवार यांनी आपली राजकीय कारकीर्द चांगलीच गाजविली आहे. ते अनेक वेळा नांदेड जिल्हा परिषदचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती अशी अनेक पदे भुषविली आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली
सवना ज. नगरीचे सरपंच, चेअरमन, खरेदी विक्री संघाचे संचालक, तालुका संरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष, कृ.उ.बा. हिमायतनगर समितीचे संचालक, पेरकेवाड समाज संघटनेचे जिल्हा सदस्य, तत्कालीन आमदार सुभाष वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली माजी सभापती म्हणून पाच वर्षांचा अनुभव आणी सतत कृ.उ. बा. समीतीवर संचालक म्हणून काम पाहत असलेले जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांचा राजकीय प्रवास आजही नवतरुणाईला भुरळ घालण्यासारखाच आहे. पत्रकारितेतील गाढे अभ्यासक, सर्वच समाजबांधतील जनतेला आपल्या हक्काचा वाटणारा, सुख दुःखात नेहमीच सहभागी होऊन, विशेषतःने सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे. असे व्यक्तिमत्व…. म्हणजे गोपतवाड…. आगामी नांदेड सरसम जिल्हा परिषद गटांतील प्रबळ उमेदवार म्हणून जनता त्यांना भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून पाहते आहे.

तसेच नागापुर ग्रामपंचायतचे संरपंच प्रतिनिधी, पेरकेवाड समाज संघटनेचे भोकर तालुकाध्यक्ष, काॅग्रेस ओबिसी सेलचे भोकर तालुकाध्यक्ष, भोकर कृषि उत्पन्न बाजार समिती चे नवनिर्वाचित उपसभापती बालाजी पाटील शामनवाड यांचा राजकीय संघर्ष वाखाणण्यासारखा आहे.
सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय आदी बाबींचा विचार करून आपल्या लोकनेत्याच्या मनात आपल्या कार्याचा ठसा कसा उमटविता येईल. यांची जाणीव ठेवून राजकारणात समाजाची सेवा करत, एक एक पाऊल पुढे टाकत पेरकेवाड समाजाचे पाऊल पुढे पडते आहे. हि अभिमानाची बाब असुन, समाजातील नवतरुणाईला बांधवांना यांचा आदर्श ठेवला पाहिजे. असे जेष्ठ मंडळी सांगत होते.

Previous articleभोकर कृ. उ. बा. समितीच्या सभापतीपदी भोसीकर तर उपसभापतीपदी शामणवाड पाटील.
Next articleराजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती आयोजित