Home Breaking News दलित पँथर सामाजिक चळवळीच्या महाराष्ट्र राज्याच्या सचिव पदी आक्रमक पॅॅंथर रोहित अहिवळे...

दलित पँथर सामाजिक चळवळीच्या महाराष्ट्र राज्याच्या सचिव पदी आक्रमक पॅॅंथर रोहित अहिवळे यांची निवड

सर्व सामान्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढेन आणि त्यांच्यावर कोणताही प्रकारचा अन्याय सहन करून घेणार नाही- पॅॅंथर रोहित विलास अहिवळे

दिनेश लोंडे

फलटण, दि.२५ :- अन्यायाच्या विरोधात बंड करून समतेचा विचार घेऊन काम करत असलेले सातारा जिल्ह्याचा ढाण्या वाघ आक्रमक पॅॅंथर रोहित अहिवळे हे गेली दहा वर्ष पँथर कुटुंबासोबत एकनिष्ठ असणारे तसेच दलित पँथर सामाजिक चळवळ घराघरात, गावागावात पोहचवण्यासाठी दलित पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नामदेव ढसाळ यांच्या तालमीत तयार झालेला हा आक्रमक पॅॅंथर असुन सातारा जिल्ह्यात पॅंथरची पहिली शाखा स्थापना करणारा तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. घनश्याम भोसले यांच्या सोबत मिळून जीवाचे रान करून महाराष्ट्रात दलित पँथर सामाजिक संघटना मजबूत करण्यासाठी सिंहाचा वाटा असणारे पॅॅंथर रोहित विलास अहिवळे यांची दलित पँथर सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सचिव पदी निवड करण्यात आली असून ही निवड दलित पँथर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पॅॅंथर बाळासाहेब पडवळ यांच्या नेतृत्त्वाखाली तसेच महाराष्ट्राचा ढाण्या वाघ पॅॅंथर डॉ.घनश्याम भोसले यांच्या झुंजार नेतृत्त्वाखाली करण्यात आली तसेच महाराष्ट्रातील विविध विभागांतील पदाधिकारी यांची निवडसुद्धा यावेळी करण्यात आली पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी आकाश भाग्यवंत काकडे, फलटण तालुकाध्यक्ष पदी रोहित यशवंत अहिवळे, फलटण तालुका उपाध्यक्ष पदी दत्तात्रय लालासो आवाडे, फलटण तालुका महिला अध्यक्षपदी मनिषा लक्ष्मण घोलप यांची निवड करण्यात आली.

यावेळी उपस्थित महाराष्ट्र अध्यक्षा मा.कविताताई भोंडे, महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.महेश गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.प्रमोद लोखंडे, सातारा जिल्हा अध्यक्ष मा.लक्ष्मण काकडे, पॅंथर मा.मंगेश आवळे, सातारा जिल्हा अध्यक्षा(महिला) मा.निताताई पवार, सातारा जिल्हा अध्यक्ष मा.लक्ष्मण काकडे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष मा.जयवंत कांबळे, माण तालुका संपर्क प्रमुख मा.नवनाथ लोखंडे, वाकी शाखा अध्यक्ष मा.अभिजीत साठे व सर्व पॅंथर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघटनेचे नेतृत्व नम्रपणे स्विकारताना सर्वांना पॅॅंथर रोहित विलास अहिवळे यांनी सांगितले की मी ही आपल्या प्रमाणेच या कुटूंबाचा सदस्य असल्याने सदैव आपल्या सर्वांच्या अडीअडचणी सोडविण्याचा कसोशिने प्रयत्न करेन..कार्य करताना जातीभेद, प्रांतभेद ,विभाग भेद,तथा पद संवर्गभेद न करता समान न्यायाने कार्य करेन. संघटनेची प्रतिष्ठा वाढावी, संघटनेत, ऐक्य नांदावे, संघटनेतील सर्व नवीन जुने तसेच सेवानिवृत्त सदस्य यांच्यातील पिढीचे अंतर कमी करुन संघटना आदर्श बळकट करण्याचा निश्चित प्रयत्न करणार असुन संघटनेत कामे करण्याची व मित्र जोडण्याची प्रचंड इच्छाशक्ती व संघटनेवरील प्रेम या मुळेच आजिवन आपल्या संघटनेतील सदस्यांच्या अडचणीला तथा प्रश्नांना सोडविण्यासाठी स्वतःला वाहुन घेण्याचा संकल्प केला असून असून संघटनेच्या प्रतिष्ठेसाठी सदस्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी आता कार्ये करताना सर्वांच्याच मदतीची सहभागाची अपेक्षा आहे गरज आहे असे मत महाराष्ट्र राज्य सचिव रोहित विलास अहिवळे यांनी केले आहे

Previous article*निधन वार्ता*
Next articleशितलताई भांगे यांची शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख पदी निवड..