Home Breaking News शितलताई भांगे यांची शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख पदी निवड..

शितलताई भांगे यांची शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख पदी निवड..

अंगद सुरोशे तालुका प्रतिनिधी भूमीराजा 

हिमायतनगर प्रतिनिधी /- वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचाराने महाराष्ट्र राज्यात स्थापन झालेल्या मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाच्या नांदेड महिला जिल्हाप्रमुख पदी हदगाव तालुक्यातील शितलताई भांगे यांची दि 23 जून रोजी शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव साहेब, महिला आघाडी संपर्क प्रमुख रत्नमाला मुंडे व बाबुराव कदम साहेब यांनी त्यांची निवड करून त्यांना नियुक्ती पत्र देऊन अभिनंदन केले आहे

या बाबत सविस्तर वृत्त असे की हदगाव हिमायतनगर, किनवट माहूर सह भोकर विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठ्या प्रमानात यश संपादन करण्यासाठी जिल्हा सह तालुक्यातील महिला आघाडी संघटना बळकट करून राजकारणात महिलांना संधी देण्यासाठी शिवसेना संपर्क प्रमुख आनंद जाधव तथा हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत भाऊ पाटील सह नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर, युवासेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील व युवासेना जिल्हाप्रमुख गणेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दि 23 जून रोजी महिला आघाडीच्या नांदेड जिल्हाप्रमुख पदी शितलताई ज्योतिबा भांगे यांची निवड करून त्यांना नांदेड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे यावेळी उपस्थित उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाप्रमुख आनंद बोंढारे,युवासेना कार्यकारिणी सदस्य गीते साहेब , लांडगे साहेब,युवा सेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील हडसणीकर,युवासेना जिल्हा प्रमुख गणेश शिंदे ,दुर्गा भारती,ज्योती सरपटे, बेबीताई गव्हाणकर, गीता पुरोहित, वनमाला राठोड सह आदी युवा सेना व महिला आघाडीच्या असंख्य कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

Previous articleदलित पँथर सामाजिक चळवळीच्या महाराष्ट्र राज्याच्या सचिव पदी आक्रमक पॅॅंथर रोहित अहिवळे यांची निवड
Next articleहिमायतनगर,भोकर महामार्गावरील वडगाव फाटा जवळील मोरगाव येथे भिषण अपघात..