Home कृषीजागर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले.

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले.

👉 शेतातील विद्युत खांब मोडुन पडला.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक- 13 मे 2022

हिमायतनगर तालुक्यात काल रात्री अचानक विजेच्या कडकडासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दिनांक 12 मे रोजी रात्री आठ वाजता दोन तास पाऊसाने झोडपले. या वा-यामुळे शेतातील झाडे विद्युत खांब वर पडुन, एक खांब मोडुन पडला. अन्य दोन खांब वाकले आहेत. तारा जमिनीवर लोमकळत आहेत. कोणतीही जीवितहानी झाली नाही. या पावसामुळे शेतातील उन्हाळी ज्वारीचे नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती विभागीय अभियंता लोणे साहेब, कनिष्ठ अभियंता भडंगे साहेब, लाईनमेन पारडी जजरवाड साहेब यांना दिली आहे.

Previous articleसुना तलावातील गाळ काढण्यास प्रारंभ…..
Next articleहिमायतनगर तालुक्यात वीज कोसळून गाय आणि म्हैस ठार