Home Breaking News हिमायतनगर,भोकर महामार्गावरील वडगाव फाटा जवळील मोरगाव येथे भिषण अपघात..

हिमायतनगर,भोकर महामार्गावरील वडगाव फाटा जवळील मोरगाव येथे भिषण अपघात..

शाळेत जाणाऱ्या मुलीस ट्रकने चिरडले…मुलीचा जागीच मृत्यू..

– आरोपी हिमायतनगर पोलिसांच्या ताब्यात…

हिमायतनगर ग्रामीण प्रतिनिधी/माधव काईतवाड बोरगडीकर

हिमायतनगर /- तालुक्यातील वडगाव जवळील मोरगाव येथे आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास पूजा देवजी चिरपकटलेवार रा. मोरगाव येथील सोळा वर्षेय शाळकरी विद्यार्थिनी भोकर येथील घिसेवाड यांच्या शाळेत 11 वर्गात शिक्षण घेण्यासाठी बस स्टॉप वर जात असताना भरधाव वेगाने आलेला MH 38 D 0284 ह्या ट्रक चालकाने या मुलीस चिरडल्याची घटना आज दि 27 जून च्या सकाळी घडली तेव्हा घटनास्थळी उपस्थित असलेल्या वडगाव येथील वामनराव मिराशे यांनी ही मुलगी मोरगाव येथील देवकर महाराज यांची मुलगी असल्याचे सांगितले त्यामुळे संबंधित ट्रक चालक हा घटनास्थळा वरून प्रसार झाला होता त्याचा शोध घेऊन हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी. डी. भूसनूर व सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी यांनी सदरील आरोपीस ताब्यात घेतले असल्याचे सांगितले…

सदरील घटनेचे तपास तामसा पोलीस स्टेशन हद्दीत असल्याने तेथील सहाय्यक पोलीस निरीक्षक दळवी साहेब हे करीत आहेत..

Previous articleशितलताई भांगे यांची शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख पदी निवड..
Next articleअखेर….. नांदेड जिल्ह्यात पावसाच्या सरी तुरळक बरसल्या!