Home Breaking News अखेर….. नांदेड जिल्ह्यात पावसाच्या सरी तुरळक बरसल्या!

अखेर….. नांदेड जिल्ह्यात पावसाच्या सरी तुरळक बरसल्या!

👉 आद्रा नक्षत्रात पेरणीला सुरूवात.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 28 जुन 2023

भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील 85% लोकांचा हा मुख्य व्यवसाय शेती आहे.
बहुतांश निव्वळ शेतीवर अवलंबून असलेले, शेतकरी आजही वडीलांच्या पारंपारिक शेती या व्यवसायावर अवलंबून आहेत.
पण….. निसर्गाच्या लहरीपणा मुळे विशेषत: ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, कामगार हा वर्ग पुर्णतः कंठाळला आहे.त्यांचे कारणही तसेच विशेष आहे.

👉……. सततची नापिकी..

शेतीत दहा रुपये खर्च केला तर उत्पन्न मिळते पाच रुपये…
सततची नापिकी, शेतीवर होणारा. खते, बि- बियाणे, औषधी, मजुरी, मशागत खर्च, दुबार पेरणी, जास्त दराने बियाणे, खते, औषधी खरेदी करणे. वेळेवर वरील सर्व बाबी ( शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने) खरेदी करता न येणे. अशा अनेक कारणांमुळे आज शेतकरी पुर्णतः शेती करण्यासाठी ईतर राष्ट्रांच्या शेतकऱ्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा शेतकरी खुपच मागे आहे.

👉 रीमझीम पाऊस पडला.

नांदेड जिल्ह्यातील मोजक्या तालुक्यातील महसुल मंडळात पेरणीयोग्य पाऊस पडतो आहे. परंतु हिमायतनगर तालुक्यात आजही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. तरीही शेतकरी कापुसाची लागवड, सोयाबिन, तुर लागवड करीत आहेत. पेरणीसाठी उशीर होत आहे. आता थांबायचे कुठपर्यंत, पेरणी करावीच लागते. अशी प्रतिक्रिया एका सदध शेतकऱ्यांनी दिली आहे.

👉 अशा अडचणीच्या वेळेस कृषि विभागाची भुमिका महत्वाची आहे.

खरीप हंगामात या वर्षी पेरणीसाठी शेतकऱ्यांना उशीर झाला असला तरी, महाराष्ट्र शासन कृषि विभागांतर्गत शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन हवे आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पाऊस उशिरा पडल्यावर आपल्या शेतीत कोणती, केंव्हा, कधी, कुठल्या जमिनीत कोणत्या पिकांच्या जाती घेण्यासाठी विशेषतः कृषि विभागाने प्रत्येक गावात शेतकऱ्यांचे चर्चासत्र, शेतकऱ्यांची शेतीशाळा, शेतीविषयक सहल, सधन शेतकऱ्यांच्या शेतीवर भेटी या बाबी करणे, हे शेतकऱ्यांच्या हिताचे नक्कीच ठरेल. त्याचबरोबर प्रत्येक गावात कृषि मित्रांची निवड करण्यात यावी. जेणेकरून आपल्या गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळेल.
वरील सर्व बाबी कृषि विभागाने खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी प्रत्यक्ष दर्शनी राबविल्या तर, महाराष्ट्रातील कुठलाच शेतकरी आत्महत्या करणार नाही. हेही यावेळी नमुद करावे लागेल.

Previous articleहिमायतनगर,भोकर महामार्गावरील वडगाव फाटा जवळील मोरगाव येथे भिषण अपघात..
Next articleअखेर 20 वर्षा नंतर हिमायतनगर येथील हिंदू समशान भूमी येथील पाणी प्रश्न आमदार जवळगावकर यांच्यामुळे सुटला..