Home Breaking News पळसपुर येथे घाणीचे साम्राज्य, स्वच्छतेकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष…..

पळसपुर येथे घाणीचे साम्राज्य, स्वच्छतेकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष…..

स्वच्छतेसाठी येणारा गावपातळीवरील निधी जातो कुठ?

हिमायतनगर /…कृष्णा राठोड
तालुक्यातील पळसपुर गावपातळीपर्यंत स्वच्छतेकरिता प्रत्येक गावाकरिता लाखो, करोडो रुपयांचा निधी वितरीत केल्या जातो. अन तो निधी नागरिकांच्या सवच्छतेच्या दृष्टीने केला जातो. मात्र, त्या निधीची विल्हेवाट स्वच्छतेच्याच दृष्टीने करणे हे काम स्थानिक प्रशासनाचे असते व त्या निधीतून गाव स्वच्छतेवर भर देणे हे कामही तेवढेच महत्त्वाचे असते.
: ‘स्वच्छ भारत…स्वच्छ शहर’चा नारा देत आपले गाव स्वच्छ ठेवण्याकडे शासन-प्रशासनाकडूनआवाहन करण्यात येऊन गाव स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. मात्र, पळसपुर गावाची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे रोगाची धास्ती अन गावात ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे भविष्यात रोगाचा फैलावाला रोखता रोखता दुसऱ्याच आजाराने तोंड वर काढल्यास यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधूनच उपस्थित केल्या जात आहे.

स्वच्छतेवर किती खर्च होतो? मात्र, निधी तर मिळतो; मात्र तो निधी खरोखरच स्वच्छतेच्या कामावर किती खर्च होतो हे गावात अस्वच्छतेवरून स्पष्ट होते. गावातील अनेक भागातील नाल्या या घाणीने तुडूंब भरलेल्या असून ते घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. तर काही ठिकाणी कचरा हा अस्ताव्यस्त पसरून रोगाला आमंत्रण देण्याचं काम करीत आहे. गावात स्वच्छतेवर भर असल्याची ओरड स्थानिक ग्रामपंचायत केली जात असली तरी गावातचा ठिकाणी असलेली घाण व कचरा हे स्वच्छतेबाबत किती जागृत आहे हे दाखवून देते.

सध्या डेगु व या सारख्या विषाणूने सर्वत्र थैमान घातले असून नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. नागरिक कोरोना पासून बचावाकरिता सांगण्यात येणाऱ्या उपायांचे नियोजन गांभिर्याने करण्यावर भर देत आहेत. मात्र कोरोनाला रोखण्याकरिता नागरिकांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना या कोरोनाला रोखण्यास फायदेशीर ठरतीलही. मात्र हेच होत असताना गावातील असलेली अस्वच्छता पाहता एखाद्या अन्य संसर्गजन्य आजाराने तोंड वर काढल्यास याचे विपरीत परिणाम हे गावावासियांना भोगावे लागतील. तेव्हा शासनाच्या लाखो-करोडो रुपयांच्या स्वच्छतेकरिता येणाऱ्या निधीचा काय उपयोग? अन येणारा निधी स्वच्छतेच्या उपाययोजनांवर खर्च न करता तो कोठे खर्ची होतो? हे गावाचा अस्वच्छतेच्या परिस्थितीवरून स्पष्टच होत असल्याने आता नागरिकांमध्ये कोरोनाच्या पाठोपाठ अस्वच्छतेमुळे पसरणाऱ्या संसर्गजन्य आजाराच्या भितीने नागरिकांच्या मनात आणखीच भीती निर्माण झाली आहे.शासनाने ठोस पावले उचलावीत तेव्हा नागरिक शासन-प्रशासनाला सहकार्याची भूमिका ठेवत असताना प्रशासनाने अशाप्रकारे नागरिकांच्या जिवित्वाशी खेळण्याच्या चालविलेल्या या प्रकाराला काय म्हणावे? अन या सर्व प्रकारास जबाबदार कोण? हाही प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित केला जात असून शासनाच्या स्वच्छतेच्या दृष्टीने येणाऱ्या निधीचा गैरवापर करणाऱ्यांवर शासनानेच ठोस अशा कारवाया करत नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.

ग्रामसेवकांनी लक्ष घालावे पळसपुर गावातील रोडवर दुर्गंधीयुक्त पाणी कित्येक रोडवर वहात असून, तळीरामासह जाणारे-येणारेही रस्त्यावरच लघुशंका करत आहे. परिणामी महिलांना त्याचा त्रास होत व ग्रामसेवकांनी व सरपंचांनी यांनी यात लक्ष घालावे अशी गावकर्यांनी मागणी आहे.

कृष्णा राठोड
९१४५०४३३८१

Previous articleपरभणी जिल्ह्यात तूर्तास समाधानकारक पाऊस, पिकांना मिळतेय जिवदान!
Next articleपूर्णेतील “त्या” रेल्वे भुयारी पुलाखालच्या रस्त्यावर साचलेल्या पाण्याची