हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070
अण्णाभाऊ साठे यांचा स्मृति दिन समता माध्यमिक विद्यालयात साजरा
येवला (सुरेगांव-रस्ता)
पृथ्वी ही शेषनागाच्या फण्यावर उभी नसून ती शेतकरी कामगार कष्टकऱ्यांच्या तळहातावर उभी आहे,अशी वास्तववादी भूमिका आपल्या साहित्य गीत कवन पोवाडा व वगनाट्य लोकनाट्य ह्या कलाकृतीतून अण्णाभाऊ साठे यांनी मांडली. सामाजिक राजकीय आर्थिक क्रांतीसाठी अपेक्षित परिवर्तन बदल लोकमानसात घडून यावा याकरता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जगाला तारू शकतात असे म्हणत “जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव” या गीतातून समस्त मानव जातीच्या मुक्तीचा मार्ग अण्णाभाऊ साठे यांनी सांगितला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिला तोच खरा समस्त मानव जातीच्या उद्धाराचा सन्मार्ग आहे असे आपल्या साहित्यिक प्रतिभेतून ठणकावून सांगणारे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हे आजच्या साहित्यिक कलावंत आणि भारत देशासाठी झिजुखपूर पाहणाऱ्या लोकांनी वाचले पाहिजे व लोक माणसाला ते समजवून सांगितले पाहिजे असे मत येथील समता प्रतिष्ठान येवला संचलित समता माध्यमिक विद्यालयात संपन्न झालेल्या साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बोलताना शरद शेजवळ यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभाऊ भागवत हे होते आपल्या आर्थिक सामाजिक मागासलेपणाचे भांडवल न करता गरिबीमुळे अर्धवट सुटलेले शिक्षण व प्रतिकूल परिस्थितीतही लढण्याची वृत्ती आणि सामाजिक राजकीय सांस्कृतिक परिवर्तनाचा विचार भांडवलशाही गुलामगिरी मक्तेदारी आणि वर्ग वर्ण जात धर्म विषमते विरुद्ध तहयात आपली लेखणी जिजाऊ नारा लोकशाहीर हा केवळ मात्र महाराष्ट्र भारतीय गुलामांनाच साहित्यिक दिशा देत नाही तर तो फ्रेंच जर्मन आणि रशियन लोक चळवळीला सुद्धा नवा आयाम देतो ही अण्णाभाऊ साठे यांची साहित्यिक किमया आहे असे मत शरद शेजवळ यांनी मांडले.
विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे समजून घेतले पाहिजे तसेच वर्तमानात लिहिणाऱ्या गाणाऱ्यांनी अण्णाभाऊ साठेंना आपला आदर्श मानून नैतिक सामाजिक राजकीय धार्मिक अध्यपतन होत असताना आपल्या लेखण्या आणि वाणी समस्त मानवाच्या कल्याणासाठी समतेच्या मार्गाने झिजवावी असे मत शेजवळ यांनी व्यक्त केली. लक्ष्मण दाणे यांनी यावेळी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या अनेक प्रसिद्ध कादंबऱ्या व साहित्यिक रचनांना उजाळा देऊन विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी व अण्णाभाऊंचे साहित्य त्यांनी अभ्यासावे वाचावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिरामण पगार यांनी केले सूत्रसंचालन विनोद सोनवणे यांनी केले यावेळी मुख्याध्यापक गणेश जाधव बाबासाहेब गोविंद भाऊसाहेब झाल्टे व विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार हिरामण पगार यांनी मानले.
गणेश जाधव
मुख्याध्यापक
समता माध्यमिक विद्यालय सुरेगाव रस्ता,ता.येवला (नाशिक)