Home Breaking News वंचित युवा आघाडीचा जुने शहर पोलीस ठाण्यात ठिय्या.

वंचित युवा आघाडीचा जुने शहर पोलीस ठाण्यात ठिय्या.

योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी
सातत्याने देशद्रोही वक्तव्य करणाऱ्या
संभाजी भिडेचा समाचार घेणा-या भिडेला धडा शिकविण्यासाठी वाशिम बायपास चौकात आंदोलन करणारे वंचित युवा आघाडी पश्चिम महानगर पदाधिकारी यांचे धाकाने आडमार्गाने पळून जात कार्यक्रम स्थळी दाखल झाला होता.भिडेला पळवुन लावणा-या युवा पदाधिकारी ह्यांना ताब्यात घेतल्याने वंचित युवा आघाडीचे पदाधिकारी जुने शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि अमरावती येथे गुन्हा दाखल असलेल्या आरोपी भिडेला तात्काळ अटक करा अशी मागणी करीत ठिय्या आंदोलन करण्यात आले.
वंचित बहुजन युवक आघाडी अकोला महानगर यांच्या वतीने वाशिम बायपास या ठिकाणी वंचित बहुजन युवक आघाडीचे पदाधिकारी यांचे आंदोलनाचा धसका घेवुन संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांनी त्याच्या मार्गात बदल केला व इतर मार्गाने पळाला. इतर मार्गाने लपून कार्यक्रम स्थळी पोहोचला यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.त्या वंचित बहुजन युवक आघाडी अकोला महानगर पश्चिमचे अध्यक्ष आशिष मांगुळकर, महासचिव कुणाल राऊत ,कोषाध्यक्ष सुजित तेलगोटे, उपाध्यक्ष मनोज इंगळे ,उपाध्यक्ष आशिष सरपाते, संघटक शिखर इंगळे महानगर सचिव शिरीष ओहळ , बार्शी टाकळी तालुका अध्यक्ष अमोल जामनिक महेंद्र डोंगरे अंकित श्रीवास प्रसन्नजीत भाऊ रगडे आदित्य भाऊ गायकवाड अंकुश तायडे यांच्यासह वंचित बहुजन युवा आघाडीचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी सामिल होते.जूने शहर पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.
वंचित बहुजन युवक आघाडीचे कार्यकर्त्यांना जुने शहर पोलीस स्टेशन मध्ये डिटेन केले असल्याची माहिती मिळताच वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेश महासचिव सन्माननीय राजेंद्रभाऊ पातोडे, युवा जिल्हा अध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, पुर्व शहर युवा अध्यक्ष जय तायडे, महीला आघाडी महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक, माजी शहर अध्यक्ष बुध्दरत्न इंगोले, प्रा. संतोष हुसे शेकडो कार्यकर्तासह जुने शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल झाले.आणि पोलीस प्रशासनाकडे मागणी केली की ज्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना डिटेन करून अटक केले त्याचप्रमाणे आपण देशद्रोहाचे आरोप असल्यास संभाजी भिडे याच्यवर सुद्धा अटकेची कारवाई करावी.पोलीस टाळाटाळ करीत असल्याने पोलीस स्टेशन मध्येच ठिया दिला रात्री उशिरा एसडीपीओ दुधगावकर ह्यांनी जुने शहर पोलिस ठाण्यात दाखल होवून तपासासाठी वेळ मागुन सहकार्य करण्याची विनंती केल्याने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.तसेच पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या वंचित युवा आघाडीचे पश्चिम महानगर अध्यक्ष आशिष मांगुळकर व महासचिव कुणाल राऊत व इतर कार्यकर्त्यांची सुटका केली.
ह्यावेळी प्रशिक मोरे, आनंद खंडारे , संतोष गवई, मिलिंद दामोदर, रितेश यादव, कुणाल राऊत, शेखर इंगळे, सुजित तेलगोटे, आकाश गवई, आकाश जंजाळ,संघपाल आठवले, आशिष सरपटे, आकाश शिरसाट, नितीन सपकाळ, महेंद्र डोंगरे, सचिन शिराळे, धर्मेंद्र दंदी, मंगेश गवई,वैभव खडसे, सचिन डोंगरे, मनोज इंगळे,अमोल बी. शिरसाट,विशाल दंदी,रंजीत तायडे, आकाश सावळे,अंकुश तायडे, शिरीष ओव्हाळ,गोलु खिल्लारे,राजेश बोदडे, आशिष सोनोने, मनोज बागडे,धम्मपाल तायडे, स्वप्निल बागडे, साहील मोरे, संतोष सावंग,पंकज खंडारे, शंकर सरदार, शिलवंत शिरसाट आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleमहाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी रवि लांडे (पाटील )यांनी आज एका निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी आणि पोलीस स्टेशन बाळापुर येथे एका निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली…
Next articleनियुक्त रूजु ठाणेदार सुनिल आंबुलकर यांचे विविध संघटणने केले स्वागत.