Home Breaking News बुलढाण्याच्या महामोर्चात “जरांगे पाटलांचे कुटुंबीय” सहभागी होणार?

बुलढाण्याच्या महामोर्चात “जरांगे पाटलांचे कुटुंबीय” सहभागी होणार?

उमेश मोरखडे शहर प्रतिनिधी खामगाव

बुलडाणा:-मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यात उपोषण छेडले आहे. त्यांचे उपोषणाने राज्य सरकारची झोप उडाली आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जरांगे पाटील हे नाव घुमत आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना बुलढाणा येथील क्रांती मोर्चात बोलवण्यासाठी समन्वयकांनी प्रयत्न सुरू केले असून राज्याचे आकर्षण असलेले हे कुटुंब बुलढाण्याच्या मराठा क्रांती मोर्चा सहभागी झाल्यास या मोर्चाची उंची अर्थातच वाढणार आहे.

*प्राप्त माहितीनुसार जरांगे पाटील यांची मुलगी मोर्चात संबोधित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.*

*मनोज जरांगे पाटील हे नाव आज राज्यापासून केंद्र पर्यंत परिचित झाले आहे. जालना जिल्ह्यातील ह्या तरुणाने मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई छेडली आहे. त्यांचे उपोषण दडपण्यासाठी पोलिसांनी जालना येथे लाठी हल्ला केला. यामध्ये अनेक स्त्री-पुरुष जखमी झाले. अमानुषपणे झालेल्या हल्यामुळे महाराष्ट्रामध्ये असंतोष धुमसत आहे. आरक्षणाची मागणी व या घटनेच्या निषेधार्थ बुलढाणा येथे मराठा क्रांती मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.

Previous articleपर्यावरण मित्र बहुउद्देशीय संघटना भारत संघटनेच्या वतीने आज शेगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
Next articleधनगर समाजाला ‘एसटी’मध्ये आरक्षण द्यावे; धनगर समाज बांधवांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने