Home Breaking News धनगर समाजाला ‘एसटी’मध्ये आरक्षण द्यावे; धनगर समाज बांधवांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

धनगर समाजाला ‘एसटी’मध्ये आरक्षण द्यावे; धनगर समाज बांधवांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

नागेश घायवट जिल्हा प्रतिनिधी अकोला

अकोला : राज्यातील संपूर्ण धरगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण त्वरित देण्यात यावे, अशी मागणी करीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव युवा समिती व सकल युवक धनगर समाज संघटनेकडून बुधवार, दि. १३ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवकांनी विविध घोषणाबाजी केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आल्या.

धनगर समाजबांधवांसाठी घरकूल योजनेची अंमलबजावणी त्वरित करा व संपूण राज्यातील धनगर समाजास ‘एसटी’ प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांकडे पाठविण्यात आल्या आहेत. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव युवा समितीचे अध्यक्ष सुमित नवलकार, रविराज घोंगे, विठ्ठल कवडकार, प्रशांत पातोंड, संजय नागे, केतन कात्रे, गजानन पातोंड, मोतिराम पातोंड, शुभम कवडकार, प्रथमेश अघडते, अविनाश कोकाटे, महादेव नवलकार, गजानन कोगदे, भाग्येश पांडे, प्रशांत भिवटे, आर. आर. पातोंड, हरिश कवडकार आदी युवक उपस्थित होते.

धनगर समाजबांधवांसाठी घरकूल योजनेची अंमलबजावणी त्वरित करा व संपूण राज्यातील धनगर समाजास ‘एसटी’ प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

Previous articleबुलढाण्याच्या महामोर्चात “जरांगे पाटलांचे कुटुंबीय” सहभागी होणार?
Next articleपिएम किसानच्या प्रलंबित लाभार्थी शेतकऱ्यांनी ईकेवायसी व आधार संलग्न करुन घ्यावे.