Home Breaking News पिएम किसानच्या प्रलंबित लाभार्थी शेतकऱ्यांनी ईकेवायसी व आधार संलग्न करुन घ्यावे.

पिएम किसानच्या प्रलंबित लाभार्थी शेतकऱ्यांनी ईकेवायसी व आधार संलग्न करुन घ्यावे.

जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 14 सप्टेंबर 2023

हिमायतनगर तालुक्यातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी ईकेवायसी व आधार संलग्नीत प्रलंबित असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी दिनांक 22 सप्टेंबर 2023 प्रयंत e kyc व आधार संलग्न करुन घ्यावे. आपल्या तालुक्यातील ekyc प्रलंबित असलेली संख्या 2930 असुन व बॅक खाते आधारशी संलग्नित लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 1678 एवढी प्रलंबित असुन वरील सर्व लाभार्थ्यांनी ekyc व बॅक खाते आधार संलग्न करून घ्यावे. आधार संलग्न करून घेण्याचे काम मागील 2 महिन्यापासून सुरू आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 15 व्या हप्त्याचे नियोजन सुरू आहे. यासाठी गांव पातळीवर कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ अधिकारी हे गावपातळीवर मोहिम राबवुन e kyc व बॅक खाते आधार संलग्न करण्याचे काम करत आहेत. लाभार्थी शेतकऱ्यांना वारंवार संपर्क करुनही e kyc किंवा आधार संलग्न करण्यासाठी प्रतिसाद देत नसलेल्या लाभार्थ्यांची नांव वगळयासाठी शासन स्तरावर सुचना प्राप्त आहेत. तरी लाभार्थ्यांनी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ अधिकारी आणि सामाजिक सुविधा केंद्र यांच्या मार्फत किंवा स्वतः e kyc व आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. त्याशिवाय प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता मिळणार नाही. जे लाभार्थी e kyc व बॅक खाते आधार संलग्न करणार नाहीत. त्यांचे नाव या योजनेतुन वगळयात येणार आहे. तरी प्रलंबित लाभार्थ्यांनी यांची काळजी घ्यावी. असे आव्हान तालुका कृषी अधिकारी व्ही. आर. चन्ना साहेब व सांख्यिकी अधिकारी एम.एस. काळे साहेब यांनी केले आहे.

Previous articleधनगर समाजाला ‘एसटी’मध्ये आरक्षण द्यावे; धनगर समाज बांधवांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
Next articleरिधोरा गावा मध्ये बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.