Home Breaking News नांदेड जिल्ह्यात शेतपांदण रस्ते मोकळे करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी.

नांदेड जिल्ह्यात शेतपांदण रस्ते मोकळे करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे भागवत देवसरकर यांची आग्रही मागणी.

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक 09 एप्रिल 2023

महाराष्ट्राचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने 3 एप्रिल ते 30 जुन दरम्यान विशेष मोहिमेचे आयोजन अहमदनगर जिल्ह्यात करण्यात आले. याच धर्तीवर नांदेड जिल्हयातील शेतकऱ्यांना शेतीवर जाण्यासाठीचे विविध रस्ते लोकसहभागातून मोकळे करण्यासाठीची विशेष मोहिम राबविण्यात यावी. अशी आग्रही मागणी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.

शेतक-यांना त्यांच्या शेतावर जाण्यासाठी व शेतातील माल वाहतुक करण्यासाठी अतिक्रमण मुक्त रस्ते अत्यावश्यक आहेत. त्यासाठी गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित बंद झालेले गाडी रस्ते, पाणंद रस्ते,शेत रस्ते, शिवार रस्ते, शेतावर जाण्याचे मार्ग व शिवरस्ते लोकसहभागाव्दारे मोकळे करुन देण्यासाठी राज्याचे महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून
3 एप्रिल ते 30 जुन, 2023 या कालावधीत विशेष मोहिम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले असुन अशा रस्त्यांची मोजणी करुन गाव नकाशावर व अधिकार अभिलेखात रस्त्यांची नोंद करने,कुटूंबाचे विभाजन होत असल्यामुळे शेतीचेदेखील विभाजन होत आहे. त्यामुळे शेतीचे क्षेत्र कमी कमी होत असुन शेतकऱ्यांचा कल त्यांच्या शेतातुन सुरु असलेली वहिवाट बंद करण्याकडे आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मोठया प्रमाणावर वहिवाट रस्ते, ग्रामीण रस्ते, हदीचे ग्रामीण रस्ते खुले करण्यासाठी मोठया प्रमाणावर प्रकरणे प्रलंबित आहेत.
शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या समस्या सोडवाव्यात यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून अहमदनगर जिल्ह्यात 3 एप्रिल ते 30 जुन दरम्यान विशेष मोहिममध्ये तहसिलदारांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून गाडीमार्ग, पायमार्ग, पाणंद रस्ते, शिवरस्ते नमूद असलेले गावनकाशे प्राप्त करुन घ्यावेत. 12 एप्रिल, 2023 पर्यंत नकाशातील ग्रामीण गाडीमार्ग, पायमार्ग, पाणंदरस्ते,शिवरस्त्यांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यातील बंद असलेल्या रस्त्यांची यादी तयार करणे. बंद असलेले रस्ते ज्या भुमापन क्रमांकातुन जातात त्यांच्या भोगवटाधारकांची यादी तयार करणे. 12 एप्रिल ते 30 जुन पर्यंत भोगवटाधारक व गावातील सरपंच, पोलीस पाटील व इतर संबंधितांची रस्ता खुला करण्यासाठी बैठक आयोजित करुन समन्वयाने व सर्वसहमतीने रस्ता खुला करण्यासाठी प्रयत्न करणे. 30 जुन,2023 पर्यंत रस्ता खुला होत नसल्यास उपअधीक्षक भूमीअभिलेख यांच्या मदतीने रस्ता निश्चित करुन तंटामुक्त समितीच्या मदतीने व आवश्यकता भासल्यास पोलीसांच्या सहकार्याने तो खुला करण्यात यावा. रस्ते खुले करण्यासाठी वेळापत्रक निर्धारित करण्यात आले असले तरी वेळापत्रकापूर्वी रस्ते खुले करण्यात यावेत. त्याचा अहवाल विहित प्रपत्रामध्ये सादर करण्याच्या सुचना देत जे तलाठी, मंडळ अधिकारी, तहसिलदार त्यांच्या कार्यक्षेत्रातील रस्ते खुले करतील त्यांचा विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे,याच धर्तीवर नांदेड जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेत रस्ते मोकळे करून देऊन दिलासा देण्याचे काम जिल्हा प्रशासनाने करावे यासंदर्भात मा.जिल्हाधिकारी नांदेड यांना तात्काळ योग्य ते निर्देश देऊन ही विशेष मोहीम जिल्हाभरात राबवावी अशी आग्रही मागणी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे भागवत देवसरकर यांनी केली आहे.

Previous articleहिरण्यगर्भ सिरंजनी केसरी कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न..
Next article*💪*स्वतःमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करावा*