Home Breaking News रेणके आयोग लागू करण्यासाठी महाराष्ट्रभर विमुक्त जाती व भटक्या जमाती संघर्ष समिती...

रेणके आयोग लागू करण्यासाठी महाराष्ट्रभर विमुक्त जाती व भटक्या जमाती संघर्ष समिती बांधणी करणार

ॲड. पल्लवीताई रेणके प्रदेशाध्यक्ष, विमुक्त जाती भटक्या जमाती (VJNT) विभाग, महा. प्र. काँगेस

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

दि.: २८ मार्च २०२३ रोजी ठिकाण नाशिक येथे श्रीराम हायस्कूल, पंचवटी येथे लोकनेते जी. जी. चव्हाण काका यांच्या अध्यक्षतेखाली व ॲड. पल्लवीताई रेणके प्रदेशाध्यक्ष, विमुक्त जाती भटक्या जमाती (VJNT) विभाग, महा. प्र. काँगेस कमिटी यांच्या प्रमुख उपस्थितीत विमुक्त जाती व भटक्या जमातीचा नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
काँग्रेसने २००६ साली भटक्या विमुक्तांच्या कल्याणासाठी नेमलेल्या रेणके आयोगाच्या शिफारशीवर सखोल चर्चा करण्यात आली. संविधानिक अधिकारा पासून, स्वातंत्र्या पासून वंचित असणाऱ्या या समाजाला अधिकार द्यायचे असतील तर पक्षभेद बाजूला सारून भटक्या विमुक्त जाती जमातितील तरुण वर्गाने यावर अभ्यास व जनजागृती करून रेणके आयोग लागू करण्यासाठी संघटन उभे करणे गरजेचे आहे असा सूर या बैठकीतून निघाला. समाजासाठी एकत्र येवून रेणके आयोग लागू करणे व जात निहाय जनगणना करणे या मुद्द्यांवर राज्यात आंदोलन उभे करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. यावेळी ॲड. पल्लवीताई रेणके यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर विमुक्त जाती व भटक्या जमाती संघर्ष समिती काम करणार असल्याचे सर्वांमत ठरविण्यात आले.
ज्याप्रमाणे मराठा समाजाचा एक मराठा लाख मराठा हा मोर्चा निघाला, ओबीसी मोर्चा निघाला या सर्व मोर्चात विमुक्त जाती व भटक्या जमाती तील सर्व पदाधिकारी या समाजाच्या पाठीशी उभे राहिले होते त्याच प्रकारे रेणके आयोग लागू होण्यासाठी VJNT संघर्ष समिती महाराष्ट्रभर दौरे करणारा असून नाशिक येथे मोठा मेळावा घेणार असल्याचे श्री शरद काशिनाथ बोडके जिल्हाध्यक्ष विमुक्त जाती व भटक्या जमाती यांनी प्रतिपादन केले.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस काँग्रेसचे कमिटीच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष बादल गायकवाड, शहराध्यक्ष आकाश छाजेड, प्रदेश सरचिटणीस सुरेश मारू मध्य ब्लॉक अध्यक्ष निलेश बबलू खैरे अल्पसंख्यांक अध्यक्ष हनिफ बशीर आदी मान्यवर उपस्थित होते
सदर कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे कल्पनाताई पांडे बापू शिंदे मंगुलाल जाधव सोमनाथ मोहिते रतन सांगळे योगेश बर्वे नवनाथ ढगे आशाताई मोहिते आप्पा गवळी गवळी मुक्तेश्वर मुंशेट्टीवार
डी के गोसावी भिमा काळे बापू बैरागी हिमांशू चव्हाण सुधाकर गवळी डीवायएसपी गोपाल, संजय गोसावी, गजानन गोसावी, बाळासाहेब गोसावी, सुर्यभान गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleविचार सुद्ध करण्याचे साधन म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह!
Next articleहिमायतनगर श्रीरामजन्मोत्सव मिरवणुकीत खासदार हेमंत पाटिल यांच्या उपस्थितीने रामभक्तांत उत्साह