Home Breaking News आई-वडीलांनी मुलां-मुलीच्या अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

आई-वडीलांनी मुलां-मुलीच्या अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

👉पोलीस उपनिरीक्षक बालाजी महाजन.

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक -17 सप्टेंबर 2022

हिमायतनगर शहरातील एका खासगी कोचींग क्लासेसचा आज पालक मेळावा आयोजित केला होता. प्रमुख मार्गदर्शक म्हणून हिमायतनगर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक बालाजी महाजन साहेब यांनी मार्गदर्शन केले.
आपल्या पाल्यांची अभ्यासात प्रगती बघायची असेल सर्वप्रथम आपण आपल्या पाल्यांना टि. व्हि. आणि मोबाईल पासुन दुर ठेवले पाहिजे. माता भगिनींनी. टि. व्हि. वरील सीरीयल न बघता व मोबाईल न बघु देता, आपल्या मुला-मुलींच्या अभ्यासाकडे लक्ष दिल्यास, विद्यार्थ्यांची प्रगती निश्चितच होते. असेही महाजन साहेब यांनी सांगितले आहे.
या अगोदर क्लासेसचे संचालक रामसर यांनीही मनोगत व्यक्त करतांना आपला मुलगा-मुलगी भविष्यात मोठ्या पदावर पाहायचे असेल तर, संस्कार, शिस्त, सतत अभ्यास यावर पालकांनी लक्ष द्यावे. बाकी अभ्यासाचे नियोजन आम्ही करु. असेही ते म्हणाले. आम्ही कुठे शिकवितांना कमी पडत आहोत. यांची पालकांनी वेळोवेळी मार्गदर्शन करावे. काही शिक्षक कर्मचारी, अधिकारी यांचेही पाल्य आमच्या क्लासेस मध्ये आहेत. आम्ही वेळीच आपल्या सुचनेचा आदर करीत कठोर परिश्रम घेतो. असेही रामसर यांनी सांगितले.
सुत्रसंचालन मॅडम यांनी केले. आभार प्रदर्शन रामसर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी मिरेवाडसर व ईतल सर्वांनी कठोर परिश्रम घेतले.

Previous articleमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे ध्वजारोहण गुरुकुल इंग्लिश स्कूल शाळेत माजी सैनिकांच्या हस्ते संपन्न!
Next articleसेवा पंधरवाडा कार्यक्रमानिमित्त वृक्षारोपण व रक्तदान शिबिर संपन्न.