Home Breaking News शहरातील नगरपालिकेच्या मार्फत कचरा गोळा करणाऱ्या वाहन चालक व कर्मचाऱ्यांचा लायन्स संस्कृती...

शहरातील नगरपालिकेच्या मार्फत कचरा गोळा करणाऱ्या वाहन चालक व कर्मचाऱ्यांचा लायन्स संस्कृती क्लब तर्फे सत्कार.

खामगाव:-(अजयसिंह राजपूत) महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान म्हणून शहरातील स्वच्छता अबाधित राहावी म्हणून घरातील कचरा गोळा करण्यासाठी येत असलेल्या कचरा गोळा करणाऱ्या गाड्यांचे ड्रायव्हर व तसेच कचरा संकलन करणारे कर्मचारी हे सातत्याने आपले काम बजावीत असतात त्यामुळे आपल्या शहराची स्वच्छता राहते व पर्यायाने आपले आरोग्य सुद्धा उत्तम राहते यांचे ऋण खेळण्याच्या दृष्टिकोनातून लायन्स क्लब संस्कृतीतर्फे विविध भागातील सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार त्यांना भेट वस्तू देऊन करण्यात आला याप्रसंगी लॉयन्स क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी आपापल्या परिसरातील संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.

अशी माहिती लॉयन्स क्लबचे पी आर ओ लॉ राजकुमार गोयनका यांनी दिली

Previous articleअनुसूचित जाती-जमाती विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अध्यापकभारतीची मागणी शिष्यवृत्ती/ फ्रिशीप योजनेअंतर्गत प्रकरणे चार वर्षांपासून प्रलंबित
Next articleधानोरा सह अनेक खेड्यातून असंख्य कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश