Home Breaking News लॉयन्स क्लब संस्कृती खामगाव तर्फे दिवाळी साजरी

लॉयन्स क्लब संस्कृती खामगाव तर्फे दिवाळी साजरी

उमेश मोरखडे शहर प्रतिनिधी

खामगाव:-समाजसेवेच्या कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या लॉयन्स क्लब संस्कृती खामगावच्या वतीने दिवाळीचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.खामगांव येथील स्थानिक श्री भैय्युजी महाराज सूर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रमशाळेतील सुमारे 525 मुलांना मिठाई व फराळाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले.
लॉयन्स क्लब संस्कृती खामगाव तर्फे मुलांच्या शैक्षणिक व दैनंदिन गरजांनुसार शाळेत सेवा उपक्रम राबविला जातो.
वितरणावेळी लॉयन्स क्लबचे सदस्य, शाळेचे अधिकारी व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.लॉयन्स क्लब संस्कृती खामगावच्या वतीनेही शाळेच्या गरजेनुसार वेळोवेळी मदत केली जाते.

Previous articleटिपू सुलतान एकता ग्रुप शेगावच्या वतीने; हजरत टिपू सुलतान रहमतुल्ला यांची 273 वी जयंती साजरी करण्यात आली
Next articleपशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याची गोमाता दगावली; नुकसान भरपाई देण्याची मागणी …..