Home Breaking News हिमायतनगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटात महिला राज….

हिमायतनगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटात महिला राज….

👉 ईच्छुकाचे मनसुबे मिळाले धुळीस....

@ राजकीय चर्चा @
हदगाव- हिमायतनगर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रिय, विद्यमान आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांनी मागील पंचवार्षिक निवडणुकीत आपले निर्विवादपणे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. हे कुणालाही नाकारता येत नाही.
आज नांदेड जिल्हा परिषदेचे आरक्षणाची सोडत पुर्ण पुणे पडली आहे. यामध्ये प्रामुख्याने हिमायतनगर तालुक्यातील अनेक पुरुष उमेदवारांनी गुढघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांचा आज हिरमोड झाला. सरसम आणि नव्याने निर्माण झालेला सिरंजनी गटात सर्वसाधारण महिला असे आरक्षण सुटले आहे. तर विद्यमान आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांच्या दुधड- कामारी गटात अनुसुचित जाती (SC) या प्रवर्गासाठी आरक्षीत झाला आहेत.
एकंदरीत सरसम आणि सिरंजनी जिल्हा परिषद गटात आपल्या कारभारणीला पुढे केल्याशिवाय पर्याय नाही. अशी चर्चा जिल्हा परिषद दोन्ही गटातील मतदार बंधुनी बोलुन दाखवली आहे.

Previous articleयावर्षीचा खरीप हंगाम पावसाने केला उद्ध्वस्त ! शेतकऱ्यावर आणली उपसमारीची वेळ … शेतकरी सापडला अतिसंकटात……..
Next articleनाशिक महानगरपालिकेतील ओबीसी आरक्षणाची सोडत आज काढणार