Home Breaking News लोकनेते बाबुराजी कदम कोहळीकर यांच्या पुढाकाराने रखडलेले घरपडीचे 2022 चे अनुदान लाभार्थ्यांना...

लोकनेते बाबुराजी कदम कोहळीकर यांच्या पुढाकाराने रखडलेले घरपडीचे 2022 चे अनुदान लाभार्थ्यांना वाटप

अंगद सुरोशे हिमायतनगर /प्रतिनीधी

हिमायतनगर तालुक्यातील पंचायत समिती व तहसिल कार्यालयात अंतर्गत 1579 लाभ धरकाच्या घरांची सन 2022 मध्ये घरांची झालेल्या अतिवृष्टीत अनेक गोरगरीब नागरिकांच्या मातीच्या भीती व घरावरील टीन पत्रे वादळी वाऱ्यामध्ये उडून गेली होती तर काही जणांच्या भिंती पाण्याच्या पावसाने पडुन तालुक्यातील 52 ग्रामपंचायती मध्ये अनेकांचे नुकसान झाले होते त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले तेव्हा संबंधित गावच्या ग्रामसेवक व तलाठी यांनी ह्याचे पंचनामे करून सर्व अहवाल शासन दरबारी जमा केले होते.

नैसर्गिक आपत्तीचा निधी येथील तहसील व पंचायत समिती प्रशासनांकडून का वाटप करण्यात आला आहे. लोकनेते बाबुरावजी कदम कोहळीकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मागील दोन दिवसापासून घरपडीच्या अनुदानाचा पहिला टप्पा प्रत्येकी सहा हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. दुसरा टप्पा देखील जमा करणे सुरू असुन तिसऱ्या टप्यातील लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात अनुदान प्राप्त होताच त्या टप्प्यातील लाभार्थ्यांना घरपडीचे अनुदान मिळणार असल्याची माहिती तहसील कार्यालयातून मिळाली आहे.

लोकनेते बाबुरावजी कदम कोहळीकर यांच्या कार्य तत्परतेने एका वर्षापासून थांबलेले घरपडीचे अनुदान वाटप अखेर सुरू झाले असल्याने लाभार्थ्यांत आनंद निर्माण झाला आहे. तहसीलदार गायकवाड, गटविकास अधिकारी सुधिश मांजरमकर, तहसील चे गडमवार, पंचायत विभागाचे विशाल पवार, मझहर, यांच्याकडून काम सुरू आहे.

मागील सात दिवसांपूर्वी म्हणजे दिनांक 16 नोव्हेंबर रोजी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन हरडपकर, युवा सेना तालुका प्रमुख बाळा पतंगे,शामभाऊ येणेकर,प्रकाश हामपोलकर, बाळाजी करेवाड, धम्मपाल वाठोरे, सरपंच पवन करेवाड, शाम हुलकाने,गजानन गोपेवाड सह आदीनी येथील महसूल प्रशासनास धारेवर धरून येत्या पाच दिवसात हा निधी तात्काळ वाटप करून गोरं गरीब नागरिकांची दिवाळी साजरी करण्याची मागणी केली होती अखेर त्यांच्या मागणीला आज यश आले आहे.

Previous articleऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाअंतर्गत पैनगंगा व पूर्णा नदीवरील बंधाऱ्यांचा मुख्यमंत्री वॉर रुम प्रकल्पात समावेश खासदार हेमंतभाऊ पाटील
Next articleकाँग्रेसच्या नऊ ग्रामपंचायत सदस्यां सह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश :- जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर