Home Breaking News सकल मराठा समाजाची जरांगे पाटिल यांच्या विदर्भ दोऱ्या दरम्यान खामगांव येथील संभाव्य...

सकल मराठा समाजाची जरांगे पाटिल यांच्या विदर्भ दोऱ्या दरम्यान खामगांव येथील संभाव्य सभेच्या निमित्ताने खामगांव येथे नियोजन बैठक संपन्न

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी

सकल मराठा समाज खामगांवच्या वतीने मर्द मराठा मावळा मनोज दादा पाटील जरांगे यांच्या विदर्भ दोऱ्या दरम्यान खामगांव येथील संभाव्य सभेचे नियोजन आयोजन संदर्भात चर्चा विनिमय करण्या करिता आज दिनांक 25 नोव्हेंबर 2023 वार शनिवार रोजी सायंकाळी 5 वाजता हॉटेल तुळजाई मधील कुलस्वामिनी हॉल मध्ये महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकी मध्ये खामगांव शहर व ग्रामीण परिसरातील सकल मराठा समाज बांधव व मराठा समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत सर्वानुमते असे ठरविण्यात आले की खामगांव येथील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणी करिता समाज भुषण निःस्वार्थी समाज सेवक मर्द मराठा मावळा मनोज दादा जरांगे पाटील यांची ही साभा सर्व समाज बांधव ऐक जुटिने ऐक दिलाने काम करुन अगदी नियोजन बद्ध पद्धतीने अविस्मरणीय रीत्या यशस्वी व पार पाडू संपुर्ण महाराष्ट्रात ही सभा रेकॉर्ड ब्रेक सभा होइल असा विश्वास उपस्थित सकल मराठा समाज बांधवानी दर्शविला.तसेच सभ्येच्या नियोजनाच्या अनुषंगाने विविध विषयांवर मराठा समाजातील ज्येष्ठा नी व युवकानी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा केली या प्रसंगी खामगांव शहर व ग्रामीण परिसरातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Previous articleकाँग्रेसच्या नऊ ग्रामपंचायत सदस्यां सह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश :- जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर
Next articleमुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना अकोला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर