Home Breaking News मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना अकोला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना अकोला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर

सर्वे झालेल्या 209 गावांमध्ये संविधान सभागृह ही योजना सुरू करण्याची समाज सेवक ….शंकर कंकाळ मागणी

अंकुश वानखडे प्रतिनिधी भूमीराजा

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सामाजिक कार्यकर्ते, समाज सेवक शंकर कंकाळ व त्यांच्या टीमने निवेदन देऊन मागणी केली आहे की अकोला जिल्ह्यातील सर्वे झालेल्या 209 गावांमध्ये संविधान सभागृह ही योजना सुरू करणे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे 500 लोकसंख्या किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांचा विकास करणे याकरिता 2021 मध्ये शासन निर्णय जीआर काढला त्यानुसार सदर गावांचा लोकसंख्येनुसार याद्या सुद्धा आल्या परंतु महोदय संविधान सभागृह या योजनेचे काम सुरू झाले नाही महोदय या योजनेमध्ये ग्रामीण अनुसूचित जाती व नवबौद्ध समाज घटकापर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोचविणे शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी अभ्यासिका सुरू करणे राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचविणे यासाठी संविधान सभागृह या मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण जीवन चारित्र्य विषयाचे प्रेरणादायी भिंतीचित्रे असतील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ग्रंथालय व अभ्यासिका साठी दालन ग्रंथालय मध्ये सर्व समावेशक विषयावर साहित्य ग्रंथ प्रबोधनात्मक साहित्य प्रेरणादायी यशोगाथांचा संग्रहाचा समावेश राहील व ग्रंथालय व अभ्यासिका दालन डिजिटल सुसज्ज राहील तसेच दर्शनी भागात संविधान स्तंभ असावा सदरहू इमारत बांधकामाची बाह्यरचना ही सध्याच्या सामाजिक न्याय भवन इमारतीच्या धरतीवर असावी व इतर सर्व बाबींचे या योजनेमध्ये ध्यान ठेवण्यात आले आहे महोदय खूप छान योजना आहे व ही भावीविद्यार्थ्यांसाठी मोलाची ठरणार व गावाचे वातावरण शिक्षणमय होणार व त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मनोबल सुद्धा वाढेल व शिक्षणाचा स्तर देखील वाढेल असा माझा ठाम विश्वास आहे त्यामुळे अकोला जिल्ह्यातील सर्वे झालेल्या 209 गावांमध्ये सुरू झाली पाहिजे महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यात सर्वे झाला असेल किंवा नसेल व तो त्वरित सुरू करण्यात यावा तसेच त्या जिल्ह्यात सुद्धा संविधान सभागृह ही योजना सुरू करण्यात यावी करिता निवेदन देण्यात आले
यावेळी पवनजी कनोजिया रेखाताई घरडे सुरज जी मेश्राम अर्जुन लोणारे अब्दुल साबीर अमरजी वाहूर वाघ गजानन दादा साठे बाळू ढोले पाटील सुगत जी भालेराव मंगलाताई अभ्यंकर वर्षाताई गजभिये मंगलाताई गवई अनिता ताई शिरसाट सिद्धार्थ वानखडे अमन घरडे आनंद मानकर बाळू इंगळे आधी सह अनेक जण उपस्थित होते

Previous articleसकल मराठा समाजाची जरांगे पाटिल यांच्या विदर्भ दोऱ्या दरम्यान खामगांव येथील संभाव्य सभेच्या निमित्ताने खामगांव येथे नियोजन बैठक संपन्न
Next articleहिमायतनगर येथील नालंदा बुद्ध विहार येथे संविधान दिन साजरा