Home Breaking News संगणक चालक बेरोजगार!

संगणक चालक बेरोजगार!

👉 वापरा आणि हस्तांतरित करा.

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 05 एप्रिल 2023

दुःख एका बेकार तरुणांचे….
पेन्शन… पेन्शन…‌ अख्खा महाराष्ट्र दुमदुमला पण….पण विभागिय कृषि सहसंचालक लातुर कार्यालय अंतर्गत विविध जिल्ह्यांतील तालुका कृषी कार्यालय येथे कार्यरत असलेले संगनक चालक यांना डायरेक्ट कामावरुन कमी केले आहे.
कृषि विभागाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थी सबसिडी घेणा-या शेतकऱ्यांची अधिकारी कशी पिळवणूक करीत आहेत. हे लोकप्रतिनिधींनी एकदा हिमायतनगर तालुक्यातील शेतकरयांना विचारावे.
मग सत्य परिस्थिती आपल्या लक्षात येईल.
अधिकारी तुपाशी, शेतकरी उपाशी अशी हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी बांधवांची दशा आजतागायत कायम आहे.
संबंध नांदेड जिल्ह्यातील तालुका कृषी कार्यालय येथे कार्यरत असलेले, संगनक चालक यांची आर्डर सतत १२ महिने चालू राहावी. यासाठी हिमायतनगर, हदगाव तालुक्यांचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेब यांनी वचन दिले आहे.
👉 पंतप्रधानमंत्री किसान योजनेचा उडाला बोजवारा

या योजनेचे काम करण्यासाठी एका संगनक हाताळता येत असलेल्या, विशेष तहसिल कार्यालयातील विविध उच्च स्तरीय अधिकारी यांच्याशी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथील कर्मचारी हे काम करत आहेत.
वास्तविक पाहता यांच्यावर कुणाचाही अंकुश नाही. म्हणून शेतकरी येरजारा मारुन परेशान आहेत. हि वास्तव चित्र लोकप्रतिनिधींनी बघुन, हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी मागणी होत आहे.

Previous articleशिक्षकांची वैद्यकीय, रजा रोखीकरण बिले अखेर मंजूर
Next articleबळकट लोकशाहीसाठी सत्य समोर सत्य मांडणे माध्यमांचे कर्तव्य : सरन्यायाधीश