Home कविता सृजनाचा ऋतुराज

सृजनाचा ऋतुराज

साऱ्या ऋतूंचा सम्राट
ऋतू वसंताचा थाट,
सृष्टी प्रणयाराधन
पक्षीगण होती भाट

सौंदर्याचा सौदागर
फुटे नवीन पालवी,
सृजनाचा ऋतुराज
कात टाके, सृष्टी नवी

लागे चैत्राची चाहूल
वाढे उन्हाची तलखी,
रती मदनाचा खेळ
निघे रामाची पालखी

आंबेडाळ, कैरी पन्हे
सृष्टी घेतेय हिंदोळे,
चैत्रा गौरीचे डोहाळे
अग्निपंखा फुटे डोळे

कैरी , काजू, फणसाचा
गंध तोंडा पाणी सुटे,
वृक्ष किंशुक पांगारा
धन यौवनाचं लुटे

कवयित्री : सरोज सुरेश गाजरे
भाईंदर, ठाणे

Previous articleराष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे नाशिक जिल्हा अध्यक्ष कोंडाज़ीमामा आव्हाड यांचे वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन
Next articleसृजनाचा ऋतुराज