Home Breaking News हिमायतनगर शहरातील वैकुंठ स्मशान भूमीच्या सुशोभीकरणाचे काम कमिटीकडून श्रमदानातून सुरू

हिमायतनगर शहरातील वैकुंठ स्मशान भूमीच्या सुशोभीकरणाचे काम कमिटीकडून श्रमदानातून सुरू

👉🏻 सर्व गावकरी व लोक प्रतिनिधीच्या मदतीने स्मशानभूमीचा कायापालट करू :- अध्यक्ष शाम ढगे...

अंगद सुरोशे
हिमायतनगर प्रतिनिधी /- शहरातील परमेश्वर गल्ली लकडोबा चौक येथील हिंदू वैकुंठ स्मशान भूमीचे काम मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होते त्यामुळे बाहेर गावा वरून येणाऱ्या पाहुण्यांना व नागरिकांना रात्री बे रात्री अंत्यविधीसाठी आल्यावर नाहक त्रास सहन करावा लागत होता या स्मशानात मोठ्या प्रमाणात तणनाशक वाढले होते व भौतिक सुविधा निर्माण झाल्या होत्या ही बाब शहरातील ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय परमेश्वर मारोती शिंदे यांच्या अंत्यविधी प्रसंगी गावकऱ्यांनी लक्षात घेऊन येथील सुजाण नागरिकांनी या वैकुंठ स्मशान भूमीच्या विकासाकरिता एक सार्वजनिक समिती गठीत केली त्या समितीचे अध्यक्ष म्हणून श्याम ढगे, उपाध्यक्ष लक्ष्मण डांगे, सचिव सुभाष बलपेलवार सह आदी जणांच्या निवडी करून सर्वांच्या सहकार्याने दर रविवारी इथे दोन घंटे वैयक्तिक वेळ देऊन श्रमदान करून येथील स्मशान भूमीचे सुशोभीकरण करण्याचे काम मागील तीन महिन्यापासून सुरू आहे त्या स्मशानभूमीच्या विकासाची सुरवात आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी समितीचे अध्यक्ष शाम ढगे यांच्या नेतृत्वात सुरुवात झाली आहे ….

यावेळी उपस्थित समितीच्या सदस्यांनी हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी सह गावकऱ्यांना आव्हान केले की शहरातील लकडोबा चौक येथील वैकुंठ स्मशान भूमीच्या सुशोभीकरणासह बांधकामासाठी जमेल तसे सहकार्य करावे असे आव्हान कमिटीचे उपाध्यक्ष लक्ष्मण डांगे ,सचिव सुभाष बलपेलवार ,विलास वानखेडे,रामभाऊ सुर्यवंशी , वामनराव पाटील मीराशे यांनी आज केले आहे दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन व 26/11 मध्ये शहीद झालेल्या शूरवीरांना भावपूर्ण आदरांजली वाहून शहरातील हिंदू समशान भूमीच्या विकास कामाची आज लोकसहभागातून सुरवात करण्यात आली यावेळी उपस्थित प्रमुख कार्यकर्त्यांनी संपूर्ण दिवस उपस्थित राहून लोकवर्गणी जमा करून येथील स्मशान भूमीच्या जागेतील कैर कचरा,खड्डे बुजून ह्या जागे मध्ये भर टाकून सर्व जागा लेवल करण्याचे काम आज सुरू करण्यात आले आहे व लवकरच हदगाव हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार माधवराव पाटील व हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत भाऊ पाटील सह इतर लोकप्रतिनिधीनी सुद्धा या स्मशानभूमीच्या सुशोभीकरणा सह विकासाकडे लक्ष द्यावे अशी मागणी स्मशान भूमी समितीकडून करण्यात आली आहे

यावेळी वैकुंठ समशान भूमी समितीचे उपाध्यक्ष लक्ष्मण डांगे, सचिव सुभाष बलपेलवार , दत्ता सूर्यवंशी, विलास वानखेडे, शांतीलाल श्रीश्रीमाळ, वामनराव मिराशे, रामभाऊ सूर्यवंशी,ज्ञानेश्वर शिंदे, प्रवीण शिंदे, बाळू अण्णा हरडपकर, श्याम पाटील, श्रीकांत घुंगरे, बालाजी तोटेवाड, आनंदराव गायकवाड,नागेश शिंदे,गणेश पाळजकर,शाम मंडोजवार, सुनील चव्हाण, सह आदी जणांनी अथक परिश्रम घेत साफसफाई केली…

लोकप्रतिनिधीने लक्ष देण्याची गरज….

स्मशान भूमी म्हणजे प्रत्येक माणसाचे शेवटचे घर असते त्यामुळे आपण दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना आपल्या घराची जशी देखरेख करतो त्याच प्रमाणे आपल्या जीवनातील शेवटच्या घराची सुद्धा सुविधा करणे हे आपले आद्य कर्तव्य असल्यामुळे हिमायतनगर शहरातील हिंदू वैकुंठ स्मशानभूमीचे काम सध्या लोक सहभागातून सुरू आहे त्या कामाकडे हदगाव हिमायतनगर तालुक्याच्या लोकप्रतिनिधी सह इतर नागरिकांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे शहरातील सुजाण नागरिकांकडून बोलल्या जात आहे…

Previous articleसंविधान दिवसानिमित्त पंचशील बुद्ध विहार शेगाव येथे शितलताई शेगोकार यांचा सत्कार …
Next articleअवकाळी पावसामुळे पिकांना जिवनदान!