Home Breaking News मराठवाडा पेरकी पेरकेवाड समाज संघटनेची बैठक संपन्न!

मराठवाडा पेरकी पेरकेवाड समाज संघटनेची बैठक संपन्न!

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक -26 डिसेंबर 2023

पेरकी, पेरकेवाड समाज संघटना नांदेडच्या वतीने जिल्हा कार्यकारणीची बैठक 25/12/2023 रोजी भाग्यनगर, नांदेड येथे पार पडली असून 7 जानेवारी 2024 रोजी नरसी येथे होणाऱ्या ओबीसी महामेळावा सह समाजातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. नरसी येथे होणाऱ्या ओबीसी महाएल्गार मेळावाल्यास पेरकी पेरकेवार_पेरकेवाड समाजातील बांधवांनी उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच भविष्यात समाज संघटनेचे धोरण निश्चित करण्यात आले त्यात नवीन कार्यकारिणी निवडून समाजासाठी पुर्णपणे वेळ देणारी कार्यकारिणी निवडून तरुण मंडळीना नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. असे सर्व कार्यकारिणीच्या वतीने एकमताने ठरविण्यात आले आहे . नरसी येथील ओबीसी मेळावा संपन्न होताच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांना व समाज बांधवांची एक मिंटिंग बोलावण्यात येईल. असे या सभेत ठराव करण्यात आला आहे याप्रसंगी गोविंदराव उल्लेवाड, गजानन तिप्पणवार, संभाजी आलेवाड, दिलीपराव अनगुलवार, गंगाधरजी बादेवाड, बालाजी सुबनवाड, दिनेश दूमनवार, अशोक अनगुलवार, सुरेश मुरशेटवाड, विश्वंभर कंदलवाड, सतीश गोपतवाड उपस्थित होते.

Previous articleआई वडिलांची निस्वार्थ सेवा करा वृद्धाश्रमाची गरज पडणार नाही…..आ. जवळगावकर साहेब
Next article*जय किसान फार्मर्स फोरमच्या “कृषिरत्न” पुरस्कारांचे उद्या नाशिकमध्ये वितरण*